जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन
जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते ध्वज विक्री
केंद्राचे उद्घाटन
वाशिम, दि. 05 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान “ घरोघरी तिरंगा ” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरीकांना घरावर राष्ट्रध्वज लावण्यासाठी ध्वज उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज 5 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, परिसरात सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे फित कापून उदघाटन केले.
ध्वज विक्री केंद्राच्या उदघाटन प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदिप महाजन, नितीन चव्हाण, सुहासिनी गोणेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, अधिक्षक राहुल वानखेडे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वझीरे, नायब तहसिलदार सविता डांगे, माधव शिंदे, नरेंद्र वाघमारे, रामधन राऊत, रविंद्र डोंगरदिवे, नाझर आनंद आरु, संतोष वंझारे, रवि दुबे, शितल पावडे, सुवर्णा सुर्वे, निता आरु, रचना परदेशी, गजानन बोंबले, किशोर पाकलवाड, निखील मनवर व श्रीकांत निजामपूरे यांच्यासह अन्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
*******
Comments
Post a Comment