मानोरा येथे महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा शुभारंभ



मानोरा येथे महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा शुभारंभ

         वाशिम, दि. 25 (जिमाका) : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत काढण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा जिल्हयात मानोरा येथे आज 25 ऑगस्ट रोजी शुभारंभ करण्यात आला. मानोरा येथील शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत या यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही. डी. राठोड, पी.पी. जामकर, श्री. रोठे, श्रीमती लांजुरकर, श्री. जवंजाळ, श्री. ठाकूर व श्री. भोळसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी स्टार्टअप व नाविन्यता यात्रेची माहिती डिजीटल वॉलवरुन दाखविण्यात आलेल्या यशोगाथा व कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेतली.

          मानोरा येथील मातोश्री सुभद्राबाई पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थींनींची यावेळी मोठया संख्येने उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकिशोर ठाकरे, करीयर कॉन्सलिंग समन्वयक प्रा. डॉ. अविनाश निळे, प्रा. निखील भगत, प्रा. डॉ. पडघाने यांच्यासह अन्य प्राध्यापक वर्ग यावेळी प्रामुख्याने उपस्थित होता.

         श्रीमती बजाज यांनी यावेळी महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेच्या माध्यमातून नाविन्यपुर्ण संकल्पना व नवं उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ही यात्रा काढण्यात आल्याचे सांगीतले. तसेच नवं कल्पनांना योग्य पाठबळ मिळण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या आणि नागरीकांच्या नवं संकल्पनांना मुर्त स्वरुप देणे हा या यात्रेचा उद्देश असल्याचे सांगीतले. या यात्रेचे तीन टप्पे असून तालुकास्तरावर प्रचार व प्रबोधन, जिल्हास्तरावर प्रशिक्षण व सादरीकरण आणि राज्यस्तरीय सादरीकरण स्पर्धा व विजेत्यांची घोषणा यांचा समावेश असल्याची माहिती श्रीमती बजाज यांनी दिली.

         प्राचार्य डॉ. ठाकरे यांनी महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या नाविन्यपुर्ण संकल्पना व नवं कल्पना या यात्रेच्या माध्यमातून मांडण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा अवश्य लाभ घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या यात्रेत सहभागी व्हावे व आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाची माहिती, नाविन्यता यशोगाथा, विभागाच्या नाविन्यता योजनेवर दोन ऑडीओ व्हिडीओ जिंगल्स विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे पॉम्पलेट्सचे उपस्थित विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. नाविन्यतेसाठी नोंदणी कशाप्रकारे करावी याबाबतची माहिती डिजीटल वॉलच्या माध्यमातून देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार श्री. भोळसे यांनी मानले.

        मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे ग्राम सचिवालय परिसरात यात्रेची माहिती ग्रामस्थांनी जाणून घेतली. यावेळी सरपंच हिम्मत राऊत, माजी पंचायत समिती सदस्य धनराज दिघडे व अजय ढोक यांच्यासह ग्रामस्थांची बहुसंख्येने उपस्थिती होती.   

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे