Posts

Showing posts from November, 2022

सामाजिक न्याय पर्वानिमित्त अनुसूचित जाती उत्थान, दशा आणि दिशा यावर कार्यशाळा संपन्न

Image
सामाजिक न्याय पर्वानिमित्त अनुसूचित जाती उत्थान, दशा आणि दिशा यावर कार्यशाळा संपन्न        वाशिम, दि. 30 (जिमाका) :  6 डिसेंबरपर्यंत सामाजिक न्याय पर्व साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आज 30 नोव्हेंबर रोजी समाज कल्याण, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, वाशिम यांच्या संयुक्तवतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे अनुसूचित जाती उत्थान, दशा आणि दिशा या विषयावर अनुसूचित जातीच्या घटकांसाठी कार्य करणारे समाजसेवी कार्यकर्ते, प्रतिनिधी व कर्मचारी वर्ग यांची कार्यशाळा संपन्न झाली.           प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले.          अनुदानित वसतीगृह व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनातून वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा व वसतीगृहामुळे विद्यार्थी शिक्षणामध्ये प्रगती करीत असल्याची माहिती दिली.         अधीक्षक कल्पना

सामाजिक न्याय पर्वानिमित्त सुरकुंडी येथील निवासी शाळेत संविधान दिन व निबंध स्पर्धा संपन्न

Image
सामाजिक न्याय पर्वानिमित्त सुरकुंडी येथील निवासी शाळेत संविधान दिन व निबंध स्पर्धा संपन्न वाशिम, दि. 29 (जिमाका) :  सामाजिक न्याय पर्वानिमित्त अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा सुरकुंडी येथे संविधान दिन ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी निवासी शाळेचे मुख्याध्यापक अतुल भगत यांनी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण केला. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. संविधानातील तत्वांचा व मुल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासोबतच शालेय विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख व त्यातील तत्वांविषयी जागृती करण्याबाबत निवासी शाळेच्या परिसरात प्रभातफेरी काढण्यात आली. विद्यार्थीनींना संविधानाचे महत्व मुख्याध्यापक श्री. भगत यांनी सांगितले. 27 नोव्हेंबर रोजी माझे संविधान, माझा अभिमान या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत इयत्ता 6 वी ते 10 वीच्या एकूण 158 विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. यावेळी

सामाजिक न्याय पर्वानिमित्त “ सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा ” या विषयावर प्रसारमाध्यम प्रतिनिधींची कार्यशाळा संपन्न

Image
सामाजिक न्याय पर्वानिमित्त   “  सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा  ”  या विषयावर प्रसारमाध्यम प्रतिनिधींची कार्यशाळा संपन्न वाशिम, दि. 29 (जिमाका) :  26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत सामाजिक न्याय पर्व साजरे करण्यात येत आहे. सामाजिक न्याय पर्वाचे औचित्य साधून आज 29 नोव्हेंबर रोजी सामाजिक न्याय भवनातील सभागृहात सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा या विषयावर प्रसारमाध्यम प्रतिनिधींची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे, पत्रकार नंदकिशोर नारे, राम धनगर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ. छाया कुलाल व समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करुन दिप प्रज्वलन करण्यात आले. अध्यक्षस्थानावरुन बोलतांना श्री. खडसे म्हणाले, राज्यातील मागास व वंचित घटकांच्या कल्याणा

समता पर्वानिमित्त श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयात संविधानविषयक अधिकार व कर्तव्ये यावर कार्यशाळा

Image
समता पर्वानिमित्त श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयात संविधानविषयक अधिकार व कर्तव्ये यावर कार्यशाळा  वाशिम,दि.२८ (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाअंतर्गत २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत समता पर्व म्हणून साजरे करण्यात येत आहे.यानिमीत्ताने आज २८ नोव्हेंबर रोजी श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथे संविधानविषयक (अधिकार व कर्तव्ये) याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली.            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. मोहन गवई होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले,राजर्षी शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.       समाज कल्याण निरीक्षक संध्या राठोड यांनी संविधान दिनानिमीत्त सामाजिक न्याय पर्व या कार्यक्रमाच्या अनुषंगाने संविधानविषयक व्याख्यान (अधिकार व कर्तव्ये) याबाबत तसेच सामाजिक न्याय विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी माहिती दिली.           सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.यु.एस. जमदाडे व प्रा.ए.एन.बहरुपी यांनी संविधान व्याख्यान कार्

माविम कार्यालयात संविधान दिन साजरा

Image
माविम कार्यालयात संविधान दिन साजरा वाशिम दि.२७ (जिमाका) महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) वाशिम येथील जिल्हा कार्यालयात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.श्री. नागपुरे यांनी यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे,सहायक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख,लेखाधिकारी गौरव नंदनवार, माविम जिल्हा कार्यालयातील कर्मचारी,गोट ट्रस्ट लखनौचे प्रशिक्षक श्री.फारुख व श्री भगत सर आणि 30 गावातील पशुसखी उपस्थित होत्या.

भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन*

Image
*भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन* मुंबई, दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयामध्ये आज भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करुन संविधान दिन साजरा करण्यात आला. माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव जयश्री भोज यांच्यासह उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.जी.वळवी, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव,  किरण देशपांडे,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यांचासह माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे तसेच पोलीस दलातील अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.   000

संविधान दिनानिमित्त प्रभात फेरी उत्साहात

Image
संविधान दिनानिमित्त प्रभात फेरी उत्साहात वाशिम,दि.२६(जिमाका) सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 26 नोव्हेंबर ते  6 डिसेंबरपर्यंत  सामाजिक न्याय पर्व साजरा करण्यात येत आहे.            यानिमित्ताने आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वाशिम येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अमोघ  कलोती,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विजयकुमार टेकवाणी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ. छाया कुलाल,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.प्रभात फेरीमध्ये सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,जिल्हा जात पडताळणी समिती व जिल्हा समाज कल्याण, जिल्हा परिषद,वसतीगृहाचे कर्मचारी व विद्यार्थी  सहभागी झाले.

संविधान दिनानिमित्त समता पर्वाचे उद्घाटन

Image
संविधान दिनानिमित्त समता पर्वाचे उद्घाटन वाशिम,दि.26 (जिमाका) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,वाशिम येथे संविधान दिनानिमित्त समता पर्वाचे आज 26 नोव्हेंबर रोजी उद्घाटन करण्यात आले.सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समता पर्वानिमित्त 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.          उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा जात पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ. छाया कुलाल होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले,राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी संविधान दिनानिमित्त राज्यघटनेच्या संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.         श्री.वाठ यांनी संविधान दिनानिमीत्त समता पर्वाला सुरुवात झाल्याची सांगितले. याअंतर्गत 6 डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात येणा-या विविध कार्यक्रमाची माहिती देवून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व शोषीत व वंचीत घटकांपर्यंत पोहो

संविधान दिनी डॉ आंबेडकरांना अभिवादन करून १०१ जात वैधता प्रमाणपत्र वाटप

Image
संविधान दिनी डॉ आंबेडकरांना अभिवादन करून  १०१ जात वैधता प्रमाणपत्र वाटप  वाशिम, दि. २६ (जिमाका) २६ नोव्हेंबर या भारतीय संविधान दिनाचे  औचित्य साधून आज वाशिम शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील त्यांच्या पुतळ्याला सकाळी अभिवादन करून पुतळ्याजवळ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मंडणगढ पॅटर्ननुसार जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप १०१ विद्यार्थ्यांना केले.                  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने जात वैधता प्रमाणापत्रांचे वाटप जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुलाल,संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मारोती वाठ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी समाज कल्याण कार्यालय व जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.               *******

संविधान दिनानिमित्त जिल्हा परिषदेत राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे सामुहिक वाचन

Image
संविधान दिनानिमित्त  जिल्हा परिषदेत राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे सामुहिक वाचन वाशिम: दि.26 : जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात आज संविधान दिनानिमित्त राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे (सरनामा) सामुहिक वाचन करण्यात आले. दि. 26 नोव्हेंबर हा दिवस शासन निर्देशानुसार सर्व शासकीय कार्यालयात संविधान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. त्यानुसार आज (दि. 26) जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम यांच्यासह विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचार्‍यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतेमेला पुष्प हारार्पण केला. यावेळी राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राज्य घटनेच्या उद्देशपत्रिकेचे (प्रस्तावना) सामुहिक वाचन करण्यात आले.  *समानता व बंधुतेच्या तत्वात बांधण्याचे काम संविधानाने केले: सुनिल निकम*  जि. प. चे जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी सु

२६ नोव्हेंबरपासून वाशिम येथे अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा

Image
२६ नोव्हेंबरपासून वाशिम येथे अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा  वाशिम दि.२५ (जिमाका) २६ नोव्हेंबरपासून वाशिम येथील नवीन पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन दुपारी ४ वाजता आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू प्यारेलाल पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या स्पर्धेत अमरावती परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांचे पोलीस अधिकारी - कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली.

२६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर सामाजिक न्याय पर्वाचे आयोजन

Image
२६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर  सामाजिक न्याय पर्वाचे आयोजन          वाशिम, दि. 25 (जिमाका) :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२ या कालावधीत सामाजिक न्याय पर्व साजरे करण्यात येणार आहे. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व सर्व नागरीकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य व समानता प्राप्त करुन देण्याच्या अनुषंगाने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताची स्वतंत्र राज्यघटना अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करण्यात आली. राज्यघटना ही २६ जानेवारी १९५० पासून अंमलात आली. संविधानामुळे शासकीय व न्यायीक इत्यादी सारख्या यंत्रणा निर्माण झाल्या. त्या संविधानाची ओळख सर्वांना करुन देण्याच्या अनुषंगाने यावर्षी सुध्दा २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२ हा कालावधी सामाजिक न्याय पर्व म्हणून साजरा करण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे सकाळी ११ वाजता सामाजिक

राष्ट्रीय आपत्ती दलाचे कार्य कौतुकास्पद - षण्मुगराजन एस. एकदिवशीय आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण

Image
राष्ट्रीय आपत्ती दलाचे कार्य कौतुकास्पद                             - षण्मुगराजन एस. एकदिवशीय आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण          वाशिम, दि. 25 (जिमाका) :  जिल्हयात गेल्या चार दिवसापासून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या मदतीने जिल्हा प्रशासन व स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिल्हयात आपत्तीविषयक जनजागृती होत आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे आपत्ती व्यवस्थापनाबाबतचे कार्य कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले.          जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पुणे यांच्या संयुक्त वतीने आज २5 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन समिती सभागृहात एक दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरुन श्री. षण्मुगराजन बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रशिक्षक पोलीस निरीक्षक राजेश

परिस्थीतीवर मात करुन दिपक झाला विक्रीकर निरीक्षक जिल्हाधिकाऱ्यांनी केला दिपकचा सत्कार

Image
परिस्थीतीवर मात करुन दिपक झाला विक्रीकर निरीक्षक जिल्हाधिकाऱ्यांनी केला दिपकचा सत्कार वाशिम, दि. 24 (जिमाका) :  वाशिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मागील 40 वर्षापासून उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता बुट पॉलीश करण्याच्या आपल्या पारंपारीक व्यवसायातून कुटूंबाचा चरितार्थ चालविणारे रामभाऊ खंदारे यांचा उच्च शिक्षीत मुलगा दिपक याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून विक्रीकर निरीक्षक या पदावर निवड झाली. दिपकच्या या यशाचे कौतुक जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज 24 नोव्हेंबर रोजी त्यांच्या कक्षात दिपकचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन अभिनंदन केले. दिपकच्या शैक्षणिक व कौटूंबिक परिस्थीतीची माहिती दिपककडून जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली व पुढील यशस्वी कारर्किदीसाठी शुभेच्छा दिल्या. दिपकचे वडील श्री. रामभाऊ खंदारे यांचेकडे शेती नाही. दारिद्रय रेषेखालील जीवन जगत असतांना बुट पॉलीश व्यवसायातून ते कुटूंबाचा आजही चरितार्थ चालवितात. आपण शिक्षण घेऊ शकलो नसलो तरी आपल्या मुलाला चांगले शिक्षण देऊन त्याला चांगल्या नोकरीतील पदावर बसलेले बघणे हे त्यांचे स्वप्न दिपकने विक्रीकर निरीक्षक या प

जिल्हाधिकाऱ्यांनी मानले सहकार्याबद्दल भाऊसाहेब काळे यांचे आभार

Image
जिल्हाधिकाऱ्यांनी मानले सहकार्याबद्दल भाऊसाहेब काळे यांचे आभार वाशिम, दि. 24 (जिमाका) :  वाशिम येथील काटा मार्गावरील काळे लॉन येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पुणे यांनी 23 नोव्हेंबर रोजी वाशिम शहरातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आपत्तीविषयक प्रशिक्षण दिले. हे प्रशिक्षण देण्यासाठी काळे लॉनचे संचालक भाऊसाहेब काळे यांनी लॉनचे सभागृह नि:शुल्क उपलब्ध करुन दिल्याबद्दल जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज 24 नोव्हेंबर रोजी त्यांचे कक्षात भाऊसाहेब काळे यांचे पुष्पगुच्छ देऊन सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजीरे व धर्मराज चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. *******

आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे -अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी कार्यालय प्रमुखांची सभा

Image
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे                                                                      -अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी कार्यालय प्रमुखांची सभा वाशिम, दि. 24 (जिमाका) :  जिल्हयातील 287 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. जिल्हयामध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त ग्रामपंचातीसाठी सार्वत्रिक निवडणूक होणार असल्यामुळे संपूर्ण जिल्हयात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आदर्श आचारसंहितेचे सर्व नागरीकांनी पालन करावे. असे आवाहन नोडल अधिकारी आदर्श आचारसंहिता तथा अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांनी केले. आज 24 नोव्हेंबर रोजी जिल्हयातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची  अंमलबजावणी करण्यासाठी कार्यालय प्रमुखांची सभा नियोजन समिती सभागृहात घेण्यात आली. यावेळी श्री. पवार बोलत होते. सभेला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक अभिनव बालुरे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ, जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी, ग्

संविधान दिनी 101 जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करणार

Image
संविधान दिनी 101 जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करणार वाशिम, दि. 24 (जिमाका) :  जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहिमेव्दारे मंडणगड पॅटर्न राबविण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने मोहिमेचे आयोजन करुन विविध उपक्रम राबविले जात आहे. या विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून वाशिम शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ 101 जात वैधता प्रमाणापत्रांचे वाटप जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, उपायुक्त तथ सदस्य डॉ. छाया कुलाल, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मारोती वाठ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. *******

जिल्हा क्रीडा संकुल येथेजिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेचे उदघाटन

Image
जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेचे उदघाटन वाशिम, दि. 24 (जिमाका) :  वाशिम जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम. यांच्या हस्ते आज 24 नोव्हेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिनकर जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे, दिगंबर लोखंडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखेडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखेडे, कृषी विकास अधिकारी विकास बंडगर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रमेश तांगडे, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. खारोले व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. क्रीडा स्पर्धेच्या प्रारंभी श्रीमती पंत यांनी

वाशिम येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण

Image
वाशिम येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण  वाशिम दि.२३(जिमाका) राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल,पुणे यांचेकडून आज २३ नोव्हेंबर रोजी वाशिम येथील काळे लॉनमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांनी आयोजित केलेल्या एक दिवसीय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम प्रशिक्षण दिले.              कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाऊसाहेब काळे होते.सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजिरे, ठाणेदार शफीक शेख, प्राचार्य डॉ तायडे,तर मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस निरीक्षक राजेश यावले,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत,राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी अमोल काळे,संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकाचे दिपक सदाफळे, दिलीप मेसरे,संजीव कव्हर,अमोल मापारी व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी उपस्थित होते.        या प्रशिक्षणाला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग,राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते.या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रममध्ये पूर,भूकंप,आग,त्सुनामी,स

शासकीय मुलांचे वसतीगृहात बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

Image
शासकीय मुलांचे वसतीगृहात बिरसा मुंडा यांची जयंती साजरी वाशिम, दि. 23 (जिमाका) :  वाशिम येथील आदिवासी मुलांच्या वसतीगृहात 22 नोव्हेंबर रोजी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, जिल्हा अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड, कार्याध्यक्ष पी.एस. खंदारे, नाजुकराव भोडणे, बाबाराव साखरे, प्रेम आर्या, दत्तराव वानखडे, शेषराव मेश्राम व गृहपाल सर्वश्री श्याम देशमुख, श्री. वानखडे, श्रीमती बिसने, श्रीमती देशमुख यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला आदिवासी मुलांच्या व मुलींच्या चारही वसतीगृहातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी देखील बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टा

तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पाळोदीच्या विद्यार्थ्यांना दिली तंबाखूच्या दुष्परिणामाची माहिती

Image
तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पाळोदीच्या विद्यार्थ्यांना दिली तंबाखूच्या दुष्परिणामाची माहिती वाशिम दि.२३(जिमाका) राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा रुग्णालय वाशिमच्या चमूने मानोरा तालुक्यातील पाळोदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत आयोजीत कार्यक्रमात तंबाखूच्या दुष्परिणामाची माहिती दिली.      जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथील तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ.ए.एम.पांढारकर यांनी तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणारा मुखाचा कर्करोग,मुख कर्करोगाची प्राथमिक लक्षणे,तंबाखूमुक्त शाळा व निकष याबाबत शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.      मानसशास्त्रज्ञ राम सरकटे यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने शरीरावर होणारे दुष्परिणाम, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध नियंत्रण अधिनियम(कोटपा 2003) तसेच तंबाखू/ गुटखा/ बिडी /सिगारेट सोडण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800112356 याबाबत शालेय विद्यार्थ्यांना माहिती दिली.           सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे यांनी शालेय विद्यार्थी व शिक्षकांना तंब

महा रेशीम अभि‍यान 2023 पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावारेशीम विभागाचे आवाहन

Image
महा रेशीम अभि‍यान 2023 पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा रेशीम विभागाचे आवाहन         वाशिम, दि. 22(जिमाका) : महा रेशीम अभियान 2023 वाशिम जिल्हयात राबविण्यात येणार आहे. या महारेशीम अभियानअंतर्गत 2023 तुती/ टसर क्षेत्र नोंदणी कार्यक्रम 15 नोव्हेंबर 2022 ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येत आहे. जिल्हा रेशीम कार्यालय, वाशिम अंतर्गत तुती लागवडीद्वारे रेशीम कोष उत्पादन ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येते. रेशीम विकास प्रकल्प हा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.            लाभार्थी निवडीचे निकष : लाभार्थी हा अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या  जमाती, भटक्या विमुक्त जमाती, दारीद्रय रेषेखालील कुटूंब, महिला प्रधान कुटूंब, शारिरीक अपंगत्व प्रधान कुटूंब, भुसूधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन्य निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती, कृषी माफी योजना सन 2008 नुसार अल्प भूधारक (1 हेक्टर पेक्षा जास्त 2

शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात जात वैधता प्रमाणपत्र मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

Image
शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात जात वैधता प्रमाणपत्र मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न वाशिम, दि. 21 (जिमाका) :  जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी जिल्हयात विशेष मोहिमेव्दारे मंडणगड पॅटर्न राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने या मोहिमेचे नियोजन करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुलाल व सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी मारोती वाठ यांच्या उपस्थितीत आज 21 नोव्हेंबर रोजी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय, वाशिम येथे जात वैधता प्रमाणपत्र कार्यपध्दती, मार्गदर्शन व जात वैधता प्रमाणपत्र वाटप कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी गवलवाड होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. छाया कुलाल तर प्रमुख अतिथी म्हणून जिमखाना उपाध्यक्ष राहूल महाजन, जिमखाना सचिव राजेश्वर ताकवाले, तंत्रनिकेतन विद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख उदयसिंग बागडे उपस्थित होते. प्रास्ताविकपर मार्गदर्शन करतांना डॉ. कुलाल यांनी मंडणगड पॅटर्नअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्

संविधान प्रास्ताविकेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन

Image
संविधान प्रास्ताविकेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन वाशिम दि.२१: दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान स्विकृती दिवस म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रबोनात्मक कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात येतो.याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात दर्शनी भागात भारतीय संविधान प्रास्ताविका लावण्यासाठी कार्यालय प्रमुख तथा अधिकारी यांना भेट देण्यात येते.         या वर्षीचा प्रास्ताविका वितरण शुभारंभ जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांच्या हस्ते आज २१ नोव्हेंबर रोजी त्यांच्या कक्षात विमोचन करून करण्यात आला           जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या कामाचे कौतुक करून हा उपक्रम स्तुत्य व राष्ट्रीय कार्यक्रम असल्याचे गौरवोद्गार काढले.आज सोमवारला  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सर्व कार्यालये,जिल्हा परिषदेमधील सर्व प्रकारची कार्यालये व पोलिस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा व सत्र न्यायालयात संविधान प्रास्ताविकाचे मोफत वितरण करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष तथा अशासकीय सदस्