शासकीय मुलांचे वसतीगृहात बिरसा मुंडा यांची जयंती साजरी
- Get link
- X
- Other Apps
शासकीय मुलांचे वसतीगृहात
बिरसा मुंडा यांची जयंती साजरी
वाशिम, दि. 23 (जिमाका) : वाशिम येथील आदिवासी मुलांच्या वसतीगृहात 22 नोव्हेंबर रोजी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, जिल्हा अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड, कार्याध्यक्ष पी.एस. खंदारे, नाजुकराव भोडणे, बाबाराव साखरे, प्रेम आर्या, दत्तराव वानखडे, शेषराव मेश्राम व गृहपाल सर्वश्री श्याम देशमुख, श्री. वानखडे, श्रीमती बिसने, श्रीमती देशमुख यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला आदिवासी मुलांच्या व मुलींच्या चारही वसतीगृहातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी देखील बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांनी गीत व नृत्य सादर केले.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भौतिक, सामाजिक, आर्थिक, भावनिक समस्या, अंधश्रध्दा व कृषी विषयक मार्गदर्शन केले. अंधश्रध्दा निर्मुलनाबाबत माहिती दिली. स्वत:चे ध्येय निश्चित करुन पुढील वाटचाल करण्यासाठी काय करावे. याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सोमनाथ मुकाडे यांनी तर आभार शिवम आगलावे यांनी मानले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment