12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करा

12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांनी

जात वैधता प्रमाणपत्र सादर करा

         वाशिम, दि. 11 (जिमाका): जात वैधता प्रमाणपत्र निर्गमीत करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करुन मंडणगड पॅटर्न राबविण्यात येत आहे. सन 2022-23 या शैक्षणिक सत्राचा अर्धा कार्यकाळ संपत आला आहे. तरी सुध्दा इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित बऱ्याच विद्यार्थ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव सादर केलेले नाही. बरेच वेळा विद्यार्थी तथा पालक यांच्याकडून जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव वेळेत सादर केले जात नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक कामाकरीता जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने, विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. जात वैधता प्रमाणपत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर करावे. असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिमच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुलाल यांनी केले आहे.

  

                                                                                                      *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश