0 ते 5 वयोगटातील बालकांची होणार मोफत आधार नोंदणी
0 ते 5 वयोगटातील बालकांची
होणार मोफत आधार नोंदणी
वाशिम, दि. 9 (जिमाका) जिल्हयातील सर्व 0 ते 5 वयोगटातील बालकांचे मोफत आधार कार्ड काढण्याला सुरुवात झाली आहे. जिल्हयातील जवळपास 5 हजार बालकांचे नोव्हेंबर अखेरपर्यत आधार कार्ड काढण्यात येणार आहे. जिल्हयातील सर्व आधार केंद्र चालकांची बालकांचे आधार नोंदणी करण्याबाबत नुकतीच वाशिम येथे एक दिवशीय मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी बाल आधार नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात बालकांची आधार नोंदणी करण्याचे शिबीर प्रत्येक गावात आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याचे आधारकार्ड काढून घ्यावे. बाल आधारकार्ड काढण्यासाठी बालकाचे जन्म प्रमाणपत्र किंवा दवाखान्याचा डिस्चार्ज दाखला व पालकाच्या बोटांची ठसे घ्यावे. बाल आधार नोंदणी करण्यास काही अडचण असल्यास महाआयटी प्रकल्पाचे जिल्हा व्यवस्थापक सौरभ जैन (8275556415) यांचेशी संपर्क साधवा.
Comments
Post a Comment