जिल्हा नियोजन समिती निवडणुक प्रारुप मतदार याद्या पाहण्यासाठी उपलब्ध ४ नोव्हेंबरला ५ वाजेपर्यंत मागणी /आक्षेप दाखल करता येतील
जिल्हा नियोजन समिती निवडणुक
प्रारुप मतदार याद्या पाहण्यासाठी उपलब्ध
४ नोव्हेंबरला ५ वाजेपर्यंत मागणी /आक्षेप दाखल करता येतील
वाशिम, दि. 2 (जिमाका) महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (निवडणूक) नियम १९९९ मधील नियम ५ मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषद निर्वाचित सदस्यांच्या आधारे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करून २ नोव्हेंबर २०२२ रोजी या कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती कार्यालय,नियोजन भवन, वाशिम व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,वाशिम यांचे कार्यालयात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. प्रारुपरित्या प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मागणी असल्यास किंवा यादीत नाव समाविष्ट करण्याबद्दल अथवा कोणत्याही नोंदीतील तपशीलाबद्दल कोणताही आक्षेप घ्यावयाचा असल्यास अशी मागणी किंवा आक्षेप ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करता येतील.याबाबत प्राप्त होणारे आक्षेप विचारात घेऊन अंतिमरीत्या मतदार यादी ७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच यादी washim.nic.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.ती पाहण्यासाठी सर्वांना उपलब्ध आहे.असे जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस.यांनी कळविले आहे.
*******
Comments
Post a Comment