अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकमतदार नोंदणी शनिवार व रविवार सुरु राहणार
- Get link
- X
- Other Apps
अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक
मतदार नोंदणी शनिवार व रविवार सुरु राहणार
वाशिम, दि. 04 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत अमरावती पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार नोंदणी करण्याच्या कार्यक्रमांतर्गत 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत दावे स्विकारण्याचा अंतिम दिनांक आहे. तथापी अमरावती विभागातील मतदार नोंदणी अधिकाधिक पदवीधारकांना करता यावी यासाठी अमरावती विभागातील सर्व जिल्हयातील सर्व मतदान नोंदणी केंद्र हे शनिवार 5 नोव्हेंबर आणि रविवार 6 नोव्हेंबर या सुट्टीच्या दिवशी देखील सुरु राहणार आहे. असे विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ अमरावती यांनी कळविले आहे.
| ******* |
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment