२६ नोव्हेंबरपासून वाशिम येथे अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा
२६ नोव्हेंबरपासून वाशिम येथे अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा
वाशिम दि.२५ (जिमाका) २६ नोव्हेंबरपासून वाशिम येथील नवीन पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन दुपारी ४ वाजता आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू प्यारेलाल पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या स्पर्धेत अमरावती परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांचे पोलीस अधिकारी - कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली.
Comments
Post a Comment