जिल्हाधिकाऱ्यांनी केली नाविन्यपुर्ण पिक लागवडीची पाहणी



जिल्हाधिकाऱ्यांनी केली नाविन्यपुर्ण पिक लागवडीची पाहणी

         वाशिम, दि. 04 (जिमाका):  जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज 4 ऑक्टोबर रोजी कारंजा तालुक्यातील किन्ही (रोकडे), चांदई व अंबोडा या गावातील काही शेताला भेट देऊन नाविन्यपूर्ण पिक लागवडीची पाहणी केली. यावेळी त्यांनी या पिक लागवडीविषयी माहिती जाणून घेतली.

       किन्ही (रोकडे) येथील पियुष काटकर यांनी बीबीएफ तंत्राने लागवड केलेल्या हरभरा पिकाची माहिती घेतली. पारंपरिक पीक पेरणी व बीबीएफ पिक पेरणीमुळे उत्पन्नात किती फरक पडतो हे त्या शेतकऱ्याकडून जाणून घेतले. चांदई येथील श्रीमती रक्षा मोटघरे यांच्या शेतात लागवड केलेल्या ड्रॅगन फळबागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी या नाविन्यपूर्ण फळबागेबद्दल माहिती घेतली. तसेच सघन आंबा लागवड, शेवगा लागवड तसेच इतर प्रकारे फळपीक लागवड केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांची प्रशंसा केली.

       अंबोडा येथील शेतकरी गटामार्फत लागवड करण्यात आलेल्या करडई पिकाची पाहणी केली. सर्व शेतकरी हे हरभरा बीज प्रक्रिया करूनच पेरणी करीत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिसून आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी संतोष चौधरी, मंडळ कृषी अधिकारी रवींद्र जटाळे, कृषी पर्यवेक्षक गुणवंत ढोकणे, सुनील शिंदे, पी. बी. ठाकरे, मंडळ अधिकारी सी. डी. मनवर, तलाठी सविता देशमुख, कृषी सहायक मंगेश सोळंके, मोहन ठाकरे, सीमा पवार, राम मार्गे, व शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.       

                                                                                                      *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश