22 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

22 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

वाशिम, दि. 7 (जिमाका) जिल्ह्यातून 15 व 16 नोव्हेंबर रोजी खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो पदयात्रा मार्गक्रमण करणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी पदयात्रेचा वाशिम शहरामध्ये मुक्काम असणार आहे.तसेच विविध पक्ष/संघटना/ सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून वेगवेगळया मागण्याकरीता धरणे/आंदोलने/उपोषण करण्यात येत आहे. जिल्हा सण-उत्सवाच्या दृष्टिने संवेदनशील आहे.सण उत्सवाच्या काळात जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे सोयीचे व्हावे यासाठी 8 ते 22 नोव्हेंबरपर्यंत जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी लागू केले आहे. हे आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय/निमशासकीय अधिकारी- कर्मचारी किंवा विवाह,अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास लागू राहणार नाही.

                                                                                                                                                  ******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश