संविधान दिनानिमित्त समता पर्वाचे उद्घाटन
- Get link
- X
- Other Apps
संविधान दिनानिमित्त
समता पर्वाचे उद्घाटन
वाशिम,दि.26 (जिमाका) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,वाशिम येथे संविधान दिनानिमित्त समता पर्वाचे आज 26 नोव्हेंबर रोजी उद्घाटन करण्यात आले.सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समता पर्वानिमित्त 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा जात पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ. छाया कुलाल होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले,राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी संविधान दिनानिमित्त राज्यघटनेच्या संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
श्री.वाठ यांनी संविधान दिनानिमीत्त समता पर्वाला सुरुवात झाल्याची सांगितले. याअंतर्गत 6 डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात येणा-या विविध कार्यक्रमाची माहिती देवून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व शोषीत व वंचीत घटकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य यु. एस. जमदाडे व प्रा.डॉ.संजय साळवे यांनी संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन केले .
डॉ. छाया कुलाल यांनी सामाजिक न्याय पर्वामध्ये एकूण 19 सेवांचे लाभ देण्यात येणार असल्याचे सांगून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने संविधान दिनी एकूण 101 जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाईन वाटप केल्याचे सांगितले.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच महिलांना अधिकार व प्रतिष्ठा मिळाली ज्यामुळे त्या विविध मोठया पदांवर कार्यरत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा.डी. एस.कव्हर यांनी केले.आभार प्रा. यु.एस. बनकर यांनी मानले.
कार्यक्रमाला वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक राहुल चोंडकर, श्रीमती आर.एन.साठे,संजय निमन, प्रदीप गवळी यांच्यासह सामाजिक न्याय विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी,जि.प.समाजकल्याण तसेच समाजकार्य महाविद्यालयातील प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी व विद्यार्थीनी,ब्रिक्स प्रा.लि.व क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment