समता पर्वानिमित्त श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयात संविधानविषयक अधिकार व कर्तव्ये यावर कार्यशाळा
- Get link
- X
- Other Apps
समता पर्वानिमित्त
श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयात संविधानविषयक अधिकार व कर्तव्ये यावर कार्यशाळा
वाशिम,दि.२८ (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाअंतर्गत २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत समता पर्व म्हणून साजरे करण्यात येत आहे.यानिमीत्ताने आज २८ नोव्हेंबर रोजी श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथे संविधानविषयक (अधिकार व कर्तव्ये) याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. मोहन गवई होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले,राजर्षी शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
समाज कल्याण निरीक्षक संध्या राठोड यांनी संविधान दिनानिमीत्त सामाजिक न्याय पर्व या कार्यक्रमाच्या अनुषंगाने संविधानविषयक व्याख्यान (अधिकार व कर्तव्ये) याबाबत तसेच सामाजिक न्याय विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी माहिती दिली.
सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.यु.एस. जमदाडे व प्रा.ए.एन.बहरुपी यांनी संविधान व्याख्यान कार्यशाळेत अधिकार व कर्तव्ये याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.डॉ.गवई यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये भाग-३ कलम १२ ते ३५ मध्ये मुलभूत अधिकार प्रदान केले आहे.भाग-४ मध्ये कलम ५१ अ मध्ये नागरीकांची कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी युवराज राठोड याने केले. आभार प्रा.ए.एन.बहरुपी यांनी मानले.
कार्यक्रमाला सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच समाजकार्य महाविद्यालयातील प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी व विद्यार्थीनी,ब्रिक्स प्रा.लि.व क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment