वाशिम येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण
वाशिम येथे
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण
वाशिम दि.२३(जिमाका) राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल,पुणे यांचेकडून आज २३ नोव्हेंबर रोजी वाशिम येथील काळे लॉनमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांनी आयोजित केलेल्या एक दिवसीय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाऊसाहेब काळे होते.सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजिरे, ठाणेदार शफीक शेख, प्राचार्य डॉ तायडे,तर मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस निरीक्षक राजेश यावले,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत,राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी अमोल काळे,संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकाचे दिपक सदाफळे, दिलीप मेसरे,संजीव कव्हर,अमोल मापारी व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी उपस्थित होते.
या प्रशिक्षणाला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग,राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते.या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रममध्ये पूर,भूकंप,आग,त्सुनामी,सर्पदंश, प्राथमिक उपचार पद्धतीविषयी प्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्याना देण्यात आले.प्रशिक्षणाचे आयोजनाच्या यशस्वीतेसाठी माजी सैनिक अमोल मापारी व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने अथक परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment