सामाजिक न्याय पर्वानिमित्त सुरकुंडी येथील निवासी शाळेत संविधान दिन व निबंध स्पर्धा संपन्न
- Get link
- X
- Other Apps
सामाजिक न्याय पर्वानिमित्त
सुरकुंडी येथील निवासी शाळेत संविधान दिन व निबंध स्पर्धा संपन्न
वाशिम, दि. 29 (जिमाका) : सामाजिक न्याय पर्वानिमित्त अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा सुरकुंडी येथे संविधान दिन ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी निवासी शाळेचे मुख्याध्यापक अतुल भगत यांनी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण केला. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. संविधानातील तत्वांचा व मुल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासोबतच शालेय विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख व त्यातील तत्वांविषयी जागृती करण्याबाबत निवासी शाळेच्या परिसरात प्रभातफेरी काढण्यात आली. विद्यार्थीनींना संविधानाचे महत्व मुख्याध्यापक श्री. भगत यांनी सांगितले.
27 नोव्हेंबर रोजी माझे संविधान, माझा अभिमान या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत इयत्ता 6 वी ते 10 वीच्या एकूण 158 विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. यावेळी शाळेतील प्रभारी अधिक्षक श्रीमती डाके, बाबासाहेब बनसोडे, अंकुश मस्के, अमोल साळवे, श्रीमती भगत, प्रकाश वाटाणे, अंजु गांजरे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment