संविधान प्रास्ताविकेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन
संविधान प्रास्ताविकेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन
वाशिम दि.२१: दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान स्विकृती दिवस म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रबोनात्मक कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात येतो.याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात दर्शनी भागात भारतीय संविधान प्रास्ताविका लावण्यासाठी कार्यालय प्रमुख तथा अधिकारी यांना भेट देण्यात येते.
या वर्षीचा प्रास्ताविका वितरण शुभारंभ जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांच्या हस्ते आज २१ नोव्हेंबर रोजी त्यांच्या कक्षात विमोचन करून करण्यात आला
जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या कामाचे कौतुक करून हा उपक्रम स्तुत्य व राष्ट्रीय कार्यक्रम असल्याचे गौरवोद्गार काढले.आज सोमवारला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सर्व कार्यालये,जिल्हा परिषदेमधील सर्व प्रकारची कार्यालये व पोलिस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा व सत्र न्यायालयात संविधान प्रास्ताविकाचे मोफत वितरण करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष तथा अशासकीय सदस्य जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती वाशिमचे डाॅ.रामकृष्ण कालापाड,अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष पी.एस.खंदारे, बुवाबाजी विरोधी संघर्ष कार्यवाह तथा अशासकीय सदस्य दतराव वानखेडे, मुकनायक विचार मंचाचे उपाध्यक्ष सुखदेव काजळे उपस्थित होते.
Comments
Post a Comment