तुळशिराम जाधव महाविद्यालयात जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन



तुळशिराम जाधव महाविद्यालयात

जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

वाशिम, दि. 18 (जिमाका) : जात वैधता प्रमाणपत्र देण्याची विशेष मोहिम मंडणगड पॅटर्ननुसार राबविण्यात येत आहे. ही मोहिम जिल्हयात प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी एल.बी. राऊत, समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुलाल, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मारोती वाठ हे जात वैधता प्रमाणपत्र कार्यपध्दती, मार्गदर्शन व जात वैधता प्रमाणपत्र वाटप कार्यशाळा घेत आहे. याचाच एक भाग म्हणून आज 18 नोव्हेंबर रोजी वाशिमजवळील लाखाळा येथील तुळशिराम जाधव कनिष्ठ विज्ञान व कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करुन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. जोशी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष एल.बी. राऊत, उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुलाल तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. तायडे उपस्थित होते.

डॉ. श्रीमती कुलाल यांनी इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन करुन त्यांना वेळीच जात प्रमाणपत्र उलब्ध करुन घेण्याचा सल्ला दिला. इयत्ता 11 वीमध्ये प्रवेश घेतल्यावर जात वैधता प्रमाणपत्र काढतांना अडचणी येणार नाही याबाबत अवगत केले. शैक्षणिक प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असून याबाबतची संपुर्ण कल्पना त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. श्री. राऊत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी त्वरीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहनही केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते 37 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. प्रमाणपत्राच्या वितरणानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना पीपीटीच्या माध्मातून जात वैधता प्रमाणपत्र कार्यपध्दती याबाबत संशोधन सहायक मोहन तिडके यांनी सादरीकरणातून माहिती दिली. यावेळी 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाचे जी.यू. गणोदे व स्वाती पवार तसेच महाविद्यालयाच्या कर्मचारी वर्गाने परीश्रम घेतले. उपस्थितांचे आभार विधी अधिकारी के.पी. राऊत यांनी मानले.  

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश