निवृत्ती वेतनधारकांना स्वाक्षरी केल्याशिवाय मिळणार नाही डिसेंबरचे वेतन
- Get link
- X
- Other Apps
निवृत्ती वेतनधारकांना स्वाक्षरी केल्याशिवाय
मिळणार नाही डिसेंबरचे वेतन
वाशिम, दि. 03 (जिमाका) : जिल्हयातील सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक व कुटूंब निवृत्ती वेतनधारक यांचे माहे नोव्हेंबर 2022 मध्ये हयातीचे दाखले प्राप्त झाल्याशिवाय माहे डिसेंबर 2022 चे मासिक निवृत्ती वेतन अदा करणे शक्य होणार नाही. हयातीच्या दाखल्याची यादी संबंधित बँकेस पाठविण्यात आली आहे. तरी सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतन व कुटूंब निवृत्ती वेतनधारक यांनी या यादीतील स्वत:च्या नावासमोर न चुकता स्वाक्षरी करावी. जे निवृत्ती वेतन व कुटूंब निवृत्ती वेतनधारक या यादीतील स्वत:च्या नावासमोर स्वाक्षरी करणार नाही त्यांचे माहे डिसेंबर 2022 चे निवृत्ती वेतन संबंधिताच्या खात्यात जमा होणार नाही. असे जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे यांनी कळविले आहे
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment