संविधान दिनी डॉ आंबेडकरांना अभिवादन करून १०१ जात वैधता प्रमाणपत्र वाटप
संविधान दिनी डॉ आंबेडकरांना अभिवादन करून
१०१ जात वैधता प्रमाणपत्र वाटप
वाशिम, दि. २६ (जिमाका) २६ नोव्हेंबर या भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून आज वाशिम शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील त्यांच्या पुतळ्याला सकाळी अभिवादन करून पुतळ्याजवळ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मंडणगढ पॅटर्ननुसार जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप १०१ विद्यार्थ्यांना केले.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने जात वैधता प्रमाणापत्रांचे वाटप जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुलाल,संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मारोती वाठ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी समाज कल्याण कार्यालय व जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******
Comments
Post a Comment