२६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर सामाजिक न्याय पर्वाचे आयोजन



२६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर

 सामाजिक न्याय पर्वाचे आयोजन 

       वाशिम, दि. 25 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२ या कालावधीत सामाजिक न्याय पर्व साजरे करण्यात येणार आहे. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व सर्व नागरीकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य व समानता प्राप्त करुन देण्याच्या अनुषंगाने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताची स्वतंत्र राज्यघटना अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करण्यात आली. राज्यघटना ही २६ जानेवारी १९५० पासून अंमलात आली. संविधानामुळे शासकीय व न्यायीक इत्यादी सारख्या यंत्रणा निर्माण झाल्या. त्या संविधानाची ओळख सर्वांना करुन देण्याच्या अनुषंगाने यावर्षी सुध्दा २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२ हा कालावधी सामाजिक न्याय पर्व म्हणून साजरा करण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे सकाळी ११ वाजता सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमाचे उद्घाटन करुन हे सामाजिक न्याय पर्व साजरे करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी दिली.

*******


Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर