शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेमध्ये यश
- Get link
- X
- Other Apps
शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेमध्ये यश
वाशिम, दि. 18 (जिमाका) : आयइडीएसएसए अंतर्गत अमरावती विभाग एच-झोनमधील सर्व पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरीता खोखो, कबड्डी, बॅडमिंटन, टेबल टेनिस व ॲथलेटिक्स अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. शासकीय तंत्र निकेतन वाशिम येथील विद्यार्थ्यांना खेळामध्ये आवड निर्माण होऊन खेळामध्ये विशेष प्राविण्य मिळविण्याकरीता संस्थेच्या उपलब्ध असलेल्या क्रीडांगणावर विद्यार्थी सराव करतात.
अकोला येथील मानव पॉलिटेक्निक येथे नुकत्याच झालेल्या खोखो स्पर्धेमध्ये शासकीय तंत्रनिकेतन वाशिमच्या विद्यार्थ्यांनी विजेतेपद मिळविले. यामध्ये अतुल शिंदे, पार्थ चोपडे, वेदांत बगाडे, हनुमान शिंदे, ओम ढोरे, ओम कौलकर, विशाल टाकरस, शिवहरी नेमाडे, पवन कंडारे, सारंग शिंदे, विजय दुगाने, हर्षल तपसी या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
महिलांच्या सामन्यामध्ये यवतमाळ येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे झालेल्या थाळीफेक स्पर्धेमध्ये वैष्णवी निमकर व लांबउडीमध्ये आकांक्षा वानखेडे यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. यामध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षाच्या पात्र विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. विजयी झालेल्या संघाचे व विद्यार्थ्यांचे संस्थेचे प्राचार्य डॉ. बी.जी. गवलवाड, क्रीडा प्रभारी यु.ए. नागे, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील खेळांसाठी शुभेच्छा दिल्या.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment