विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत पात्र व्यक्तींनी मतदार नोंदणी करावी निवडणूक विभागाचे आवाहन

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत पात्र व्यक्तींनी मतदार नोंदणी करावी 
          
निवडणूक विभागाचे आवाहन

वाशिम, दि.14 (जिमाका) भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. छायाचित्रासह विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मतदार नोंदणीचा सर्व पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले.
      आज 14 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

        श्री.महाजन यावेळी म्हणाले, 9 नोव्हेंबर 2022- एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे. 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022- दावे व हरकती स्विकारणे. 19 व 20 नोव्हेंबर आणि 3 व 4 डिसेंबर 2022-विशेष मोहिमांचा कालावधी. 26 डिसेंबर 2022 पर्यंत- दावे व हरकती निकालात काढणे.3 जानेवारी 2023 पर्यत अंतीम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे,डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे आणि 5 जानेवारी 2023 रोजी मतदार यादीची अंतीम प्रसिध्दी करण्यात येईल.अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

        निवडणूक आयोगाने एका वर्षात 4 अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीत नोंदणी करता येईल अशी सुविधा केल्याचे सांगून श्री.महाजन म्हणाले,1 जानेवारी ,1 एप्रिल,1 जुलै,1 ऑक्टोबर 2023 या वर्षाच्या तारखांना 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या युवावर्गाला मतदार नोंदणीचा अर्ज भरून देता येईल.तसेच अर्ज क्रमांक 8 व 8 अ एकत्रीत आले असून रहिवासाच्या स्थलांतरणाबाबतचा अर्ज,विद्यमान मतदार यादीतील नोंदी दुरुस्त करण्यासाठी अर्ज, कुठल्याही दुरुस्तीशिवाय मतदार ओळखपत्र बदलून देण्यासाठीचा अर्ज,दिव्यांग व्यक्ती म्हणून चिन्हांकित करण्यासाठी अर्ज अश्याप्रकारे नमुना क्रमांक 8 अद्ययावत करण्यात आला आहे. मतदारांना ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी NVSP,Voter,Voter Help Line App व Garuda App सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीअसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
      जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.या शिबिरामध्ये महाविद्यालयांच्या प्रशासनाकडून 18 वर्षे पूर्ण झालेल्या परंतु मतदार नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांकडून मतदार नोंदणीचे अर्ज भरून घेण्यात येईल.महिलांच्या मतदार नोंदणीकरिता जिल्ह्यातील महिलांसाठी कार्य करणाऱ्या महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ,महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या शासकीय संस्थांच्या तसेच अशासकीय संस्थांच्या जिल्हा प्रतिनिधींचे सहकार्य घेण्यात येईल.जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी आपल्याकडील बीएलए यांची नियुक्ती करून उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयास अहवाल सादर करावा.विशेष मतदार नोंदणी मोहिमेच्या दिवशी सर्व मतदान केंद्रावर उपस्थित राहून कामकाज करतील.

      9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022- विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबीर,12 नोव्हेंबर आणि 13 नोव्हेंबर 2022- महिला व दिव्यांग,यांचे मतदार नोदणीसाठी विशेष शिबीर आणि 26 नोव्हेंबर व 27 नोव्हेबर 2022 - तृतीय पंथीय, देह विक्री करणाऱ्या महिला आणि घर नसलेल्या भटक्या विमुक्त जमातीसाठी शिबीरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
     जिल्ह्यातील प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत एकुण मतदार पुढीलप्रमाणे आहे. वाशिम तालुका - 2 लक्ष 74 हजार 27, रिसोड तालुका - 1 लक्ष 62 हजार 340, मालेगाव तालुका - 1 लक्ष 44 हजार 266, मंगरूळपीर तालुका - 1 लक्ष 39 हजार 534 , कारंजा तालुका - 1 लक्ष 78 हजार 23,मानोरा तालुका - 1 लक्ष 19 हजार 863 असे एकुण जिल्ह्यात 9 लक्ष 51 हजार 453 मतदार असल्याचे श्री.महाजन यांनी सांगितले.
         1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करणे बाबतच्या कार्यक्रमाची माहिती सुध्दा यावेळी त्यांनी दिली.
      अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत 8 हजार 245 ऑफलाईन तर 401 ऑनलाईन असे 8 हजार 646 नागरिकांनी नोंदणी पूर्ण केली आहे. 
       जिल्ह्यातील 6 लक्ष 45 हजार 87 मतदारांचे मतदान ओळखपत्र आधारकार्डशी संलग्न झाले असून त्याची टक्केवारी 67.80 इतकी असल्याचे श्री.महाजन यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश