विधानपरिषद पदवीधर मतदासंघ निवडणूक सर्व अधिकारी व पात्र कर्मचाऱ्यांनी मतदार नोंदणी करावी -षण्मुगराजन एस.



विधानपरिषद पदवीधर मतदासंघ निवडणूक

सर्व अधिकारी व पात्र कर्मचाऱ्यांनी मतदार नोंदणी करावी

                                                                                -षण्मुगराजन एस.

        वाशिम, दि. 03 (जिमाका) : अमरावती विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी जिल्हयातील सर्व अधिकारी आणि त्यांच्या अधिनस्त  असलेल्या सर्व पात्र कर्मचाऱ्यांनी 7 नोव्हेंबरपर्यत मतदार नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी केले.

        आज 3 नोव्हेंबर रोजी पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रमाअंतर्गत सर्व पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची मतदार नोंदणी करण्याच्या अनुषंगाने वाकाटक सभागृहात जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. डी. खंबायत, जिल्हा अधिक्षक भूमीअभिलेख शिवाजी भोसले, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता व जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

       श्री. षण्मुगराजन म्हणाले, जिल्हयात आतापर्यत 4091 पदवीधरांनी मतदार नोंदणी केली आहे. नोंदणी करण्याची सुविधा ऑनलाईन किंवा ऑफलाईन सुध्दा आहे. ज्यांनी मतदार नोंदणीचे अर्ज घेतले आहे, त्यांनी ते अर्ज भरुन जमा करावे. सर्व पात्र कर्मचाऱ्यांनी मतदार नोंदणी केली आहे, त्यांनी याबाबत खात्री करावी. तालुक्याच्या ठिकाणी तहसिल कार्यालयात अर्ज भरुन सादर करावे. अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या कुटूंबातील व्यक्तींनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज संबंधित कार्यालयात आवश्यक कागदपत्रासह सादर करावे. असे ते म्हणाले.

       श्री. चव्हाण म्हणाले, अमरावती विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2023 करीता मतदार नोंदणीचा कालावधी 1 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर असा आहे. मतदार नोंदणीसाठी पात्रता तो भारतीय नागरीक असावा. मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी असावा. 1 नोव्हेंबर 2022 च्या किमान 3 वर्षे आधी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पदवी प्राप्त पदवीधर असावा. आवश्यक कागदपत्रे म्हणून मतदार ओळखपत्र/आधारकार्ड/पासपोर्ट/वाहन चालक परवाना/वीज-पाणी-गॅस जोडणीचे देयक, विद्यापीठ किंवा संबंधित संस्था
यांनी दिलेले पदवी प्रमाणपत्र/गुणपत्रिका/ समकक्ष पदवी प्रमाणपत्र, कागदपत्रातील नावात बदल असल्यास राजपत्र/विवाह नोंदणी प्रमाणपत्र/ पुरावा या कागदपत्रांची प्रत स्वयंसाक्षांकीत व पदनिर्देशीत अधिकाऱ्याकडून अधिप्रमाणीत करुन जोडणे आवश्यक आहे. मतदार नोंदणीसाठी अर्ज क्र. 18 भरावा. असे श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

       या सभेला नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिनेश बारापात्रे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजीरे व सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी अपुर्वा नानोटकर यांचेसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

                                                                                                      *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश