राष्ट्रीय युवा पुरस्कार सन २०२०-२१ करीता नामांकन अर्ज मागविले

राष्ट्रीय युवा पुरस्कार सन २०२०-२१ करीता नामांकन अर्ज  मागविले

वाशिम,दि.१ (जिमाका) जिल्हयातील युवांनी केलेले समाजहिताच्या कार्याचा गौरव युवा विकासाचे कार्य
करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी संयुक्त सचिव भारत सरकार, युवा कार्यक्रम व खेळ
मंत्रालय, नवी दिल्ली यांनी दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या पत्रान्वये राष्ट्रीय युवा पुरस्कार सन २०२०-२१ या वर्षाकरीता ६ नोव्हेंबर पर्यंत या कालावधीत अर्हता धारण करणा-या युवक- युवती व संस्था यांचे नामांकन अर्ज प्रस्ताव https://awards.gov.in या संकेतस्थळावर
ऑनलाईन पोर्टलवर पाठविण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्याबाबतची माहिती वरील नमुद
संकेतस्थळावर प्रकाशीत करण्यात आलेली आहे.
यांना केंद्रशासनाच्या पत्रात नमुद केल्यानुसार सर्व बाबींचे अवलोकन करुण ज्या युवक युवती
राष्ट्रीय युवा पुरस्कार सन २०२०-२१ या वर्षाकरीता नामांकनासाठी अर्ज / प्रस्ताव सादर करावयाचा
आहे त्यांनी प्रथम तो ऑनलाईन पोर्टलवर  ६ नोव्हेंबर पर्यंत https://awards.gov.in या संकेतस्थळावर भरावयाचा आहे. सदर प्रस्तावाच्या दोन प्रती  ४ नोव्हेंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, वाशिम येथे सादर करावे. अधिक माहीती व विहीत नमुना करीता कार्यालयात येथे संपर्क साधावा
असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश