महा रेशीम अभियान 2023 पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावारेशीम विभागाचे आवाहन
महा रेशीम अभियान 2023
पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा
रेशीम विभागाचे आवाहन
वाशिम, दि. 22(जिमाका) : महा रेशीम अभियान 2023 वाशिम जिल्हयात राबविण्यात येणार आहे. या महारेशीम अभियानअंतर्गत 2023 तुती/ टसर क्षेत्र नोंदणी कार्यक्रम 15 नोव्हेंबर 2022 ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येत आहे. जिल्हा रेशीम कार्यालय, वाशिम अंतर्गत तुती लागवडीद्वारे रेशीम कोष उत्पादन ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येते. रेशीम विकास प्रकल्प हा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
लाभार्थी निवडीचे निकष : लाभार्थी हा अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती, दारीद्रय रेषेखालील कुटूंब, महिला प्रधान कुटूंब, शारिरीक अपंगत्व प्रधान कुटूंब, भुसूधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन्य निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती, कृषी माफी योजना सन 2008 नुसार अल्प भूधारक (1 हेक्टर पेक्षा जास्त 2 हेक्टर पर्यत) व सिमांत शेतकरी (1 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र), क्षेत्रमर्यादा प्रति लाभार्थी 1 एकर या योजनेअंतर्गत रेशीम विकास प्रकल्पासाठी तीन वर्षामध्ये अकुशल व कुशल (सामग्री) मजूरी देण्यात येते. तुती लागवड व जोपासनेसाठी तीन वर्षात दिली जाणारी एकूण रक्क्म पुढीलप्रमाणे 682 मनुष्य दिवसासाठी 1 लक्ष 74 हजार 592 रुपये मजूरी, सामग्रीसाठी 61 हजार 730 अये एकुण 2 लक्ष 36 हजार 322 रुपये. किटक संगोपन गृहासाठी 213 मनुष्य दिवसाकरीता 54 हजार 528 रुपये मजुरी, सामग्रीसाठी 49 हजार 50 रुपये असे एकुण 1 लक्ष 3 हजार 578 रुपये. फलक लावण्यासाठी 3 हजार रुपये दिले जातात. तीन वर्षात 895 मनुष्य दिवसांरीता 2 लक्ष 29 हजार 120 रुपये मजूरी, सामग्रीसाठी 1 लक्ष 13 हजार 780 रुपये असे एकुण 3 लक्ष 42 हजार 900 रुपये देण्यात येते.
नानाजी देशमुख कृषी संजिवनी (पोकरा) अंतर्गत तुती रोपवाटिका, तुती लागवड, किटक संगोपन गृह व संगोपन साहित्य खरेदी साठी अनुदान दिले जाते. लाभार्थी निवडीचे निकष : इच्छूक लाभार्थी कडे मध्यम ते भारी व पाण्याची निचरा होणारी जमीन असावी, लागवड केलेल्या तुती क्षेत्रासाठी सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध असणे आवश्यक आहे, रेशीम उद्योगासाठी कुटुंबामध्ये किमान एक व्यक्ती तुती लागवड व संगोपनासाठी उपलब्ध असलेले अनुसुचित जाती /अनु.जमाती /महिला/दिव्यांग व इतर शेतकरी या घटकासाठी पात्र आहे.
नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेअंतर्गत तुती लागवडीसाठी पुढीलप्रमाणे अर्थसहाय्य करण्यात येते. तुती रोपे तयार करण्यासाठी प्रति एकर 1 लक्ष 50 हजार मंजुर मापदंडानुसार खर्च, प्रकल्प अर्थसहाय्याचे मंजुर मापदंडानुसार सर्व साधारण घटकासाठी 75 टक्के 1 लक्ष 12 हजार 500 रपये, अनुसुचित जाती/जमाती 90 टक्के म्हणजे 1 लक्ष 35 हजार रुपये, तुती लागवड विकास कार्यक्रमाकरीता प्रति एकर 50 हजार रुपये, सर्वसाधारण घटकाकरीता 37 हजार 500 रुपये, अनुसूचित जाती/जमातीकरीता 45 हजार रुपये, दर्जेदार कोष उत्पादनासाठी किटक संगोपन साहित्य/ शेती अवजारे, साहित्य पुरवठा, सहाय्य आधुनिक माऊंटेजसहित प्रति लाभार्थी 75 हजार रुपये प्रति लाभार्थी मंजूर मापदंडानुसार खर्च, सर्वसाधारण घटकाकरीता 56 हजार 250 रुपये आणि अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीकरीता 67 हजार 500 रुपये, किटक संगोपनगृह बांधणीसाठी प्रति लाभार्थी मॉडेल 1 करीता 1 हजार चौरस फुट जागेकरीता मंजूर मापदंडानुसार खर्च 1 लक्ष 68 हजार 639 रुपये, सर्व साधारण घटकाकरीता 1 लक्ष 26 हजार 479 रपये, अनुसुचित जाती/जमातीकरीता 1 लक्ष 51 हजार 775, मॉडेल- 2 करीता 600 चौरस फुट जागेकरीता 95 हजार 197 रुपये मंजुर मापदंडानुसार खर्च, सर्वसाधारण घटकाकरीता 71 हजार 397 रुपये, अनुसुचित जाती/जमाती 85 हजार 677 रुपये अर्थसहाय्य करण्यात येते.
जिल्हयात मोठया प्रमाणात रेशीम शेती उद्योग वाढीसाठी वाव असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी बारमाही सिंचनाची सोय व आधी खर्च करण्याची तयारी असलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय, पुसद नाका, उलेमाले बंगला, वाशिम येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा रेशीम अधिकारी एस. पी. फडके यांनी केले आहे.
*******
Comments
Post a Comment