संविधान दिनानिमित्त प्रभात फेरी उत्साहात
संविधान दिनानिमित्त
प्रभात फेरी उत्साहात
वाशिम,दि.२६(जिमाका) सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत सामाजिक न्याय पर्व साजरा करण्यात येत आहे.
यानिमित्ताने आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वाशिम येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अमोघ कलोती,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विजयकुमार टेकवाणी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ. छाया कुलाल,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.प्रभात फेरीमध्ये सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,जिल्हा जात पडताळणी समिती व जिल्हा समाज कल्याण, जिल्हा परिषद,वसतीगृहाचे कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले.
Comments
Post a Comment