मासेमारी साधने खरेदीसाठी मिळणार अर्थसहाय्य 11 नोव्हेंबरपर्यंत संस्थांकडून अर्ज मागविले



मासेमारी साधने खरेदीसाठी मिळणार अर्थसहाय्य

11 नोव्हेंबरपर्यंत संस्थांकडून अर्ज मागविले

         वाशिम, दि. 03 (जिमाका) : सन 2022-23 च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मासेमारी साधने खरेदीवर अर्थसहाय्य या योजनेकरीता जिल्हयातील सर्वसाधारण, अनुसूचित जाती व आदिवासी उपक्षेत्राबाहेरील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेमधील सभासदांना प्रती सभासद 5 किलो जाळे याप्रमाणे मत्स्यव्यवसाय विभागामार्फत अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. मासेमारी साधने खरेदीवर अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती व आदिवासी उपक्षेत्राबाहेरील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी प्रस्तावासोबत संस्थेच्या लेटर हेडवर विनंती अर्ज, संस्थेचा ठराव, संस्थेचा रद्द केलेला धनादेश, सभासद यादी, संस्थेचे पॅनकार्ड, संस्थेचे बँक खाते पासबुक व अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील सभासदांचे जातीचे दाखले आदी आवश्यक कागदपत्रे जोडून 11 नोव्हेंबर 2022 पर्यंत कार्यालयास सादर करावे. असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त, श्री. जयस्वाल यांनी केले आहे.   

                                                                                                                                        *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश