स्टैंड अप इंडिया योजना अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी मार्जिन मनी योजना
- Get link
- X
- Other Apps
स्टैंड अप इंडिया योजना
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी मार्जिन मनी योजना
वाशिम, दि. 03 (जिमाका) : केंद्र शासनाच्या स्टैंड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील लाभार्थ्यांकरीता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी केंद्र शासनाने १० हजार कोटींची तरतूद केला आहे ही रक्कम लघु उद्योग विकास बँकेकडे (सिडबी) वर्ग करण्यात आली आहे. लघु उद्योग विकास बँकेने या रकमेचा सुरक्षा हमी कवच तयार केले असून लाभार्थ्यांना जे कर्ज दिले जाईल त्याला लघु उद्योग विकास बँक हमी देईल. या योजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक अर्जदारास स्टैंड अप इंडिया योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित अनुदानाची १५ टक्के रक्कम राज्य शासन देणार आहे. यामध्ये १० टक्के रक्कम स्वहिस्सा राहील.
या योजनेच्या मार्गदर्शक सूचना ९ डिसेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार शासन स्तरावरून निश्चित करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment