Posts

Showing posts from January, 2020

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ‘दक्षता’ पेट्रोलपंपचे उद्घाटन

Image
·         वाशिम जिल्हा पोलीस कल्याण निधी अंतर्गत उपक्रम वाशिम , दि. २६ : जिल्हा पोलीस कल्याण निधी अंतर्गत वाशिम येथील जुने पोलीस मुख्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या ‘दक्षता’ पेट्रोलपंपचे उद्घाटन आज, २६ जानेवारी रोजी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बन्सोड, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, पोलीस उपाधीक्षक मृदुला लाड, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पवन बन्सोड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जिल्हा पोलीस कल्याण निधी अंतर्गत वाशिम शहरात पेट्रोलपंप सुरु होत आहे. हा अतिशय चांगला उपक्रम आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी मल्टीपर्पज स्टोअर उभारण्याची संकल्पना काही जिल्ह्यांमध्ये राबविली जात आहे. यामध्ये किराणा साहित्यासह इलेक्ट्रॉनिक वस्तूही सवलतीच्या दरात मिळतात. वाशिम जिल्ह्यातही असा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना लाभ होईल, असे पालकमंत्री म्ह

जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण

Image
·         धनुर्विद्या संकुलाचे उद्घाटन वाशिम , दि. २६ : जिल्हा क्रीडा संकुल येथे सेमी ऑलिम्पिक आकारातील सुसज्ज जलतरण तलावाची व धनुर्विद्या संकुलाची निर्मिती करण्यात आली आहे. धनुर्विद्या संकुल व जलतरण तलावाचे लोकार्पण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते २५ जानेवारी रोजी झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक प्रतिभा देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये, तालुका क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार, संजय पांडे, किशोर बोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. जलतरण तलावाच्या कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर पालकमंत्री श्री. देसाई व उपस्थित मान्यवरांनी तलावाची पाहणी केली. तसेच जिल्ह्यातील जलतरणपटू व नागरिकांना जलतरणाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अभिनंदन केले. जलतरण तलावाचा आकार २५ मीटर x २१ मीटर असून जलतरण तलावामध्ये ८ लेन व डायव्हिंग बोर्ड बसविण्यात आले आहेत. जलतरण स्पर्धेसाठी आवश्यक इतरही साहित्य याठि

शिवभोजन योजना गरिबांसाठी उपयुक्त - पालकमंत्री शंभूराज देसाई

Image
·         वाशिम येथे शिवभोजन योजनेचा शुभारंभ वाशिम , दि. २६ : राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात मिळावे , यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवभोजन योजना सुरु करण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या योजनेतून पहिल्या टप्प्यात राज्यातील जिल्हा मुख्यालयी १० रुपयात जेवण मिळणार आहे. वाशिम शहरातही आजपासून शिवभोजन योजनेचा शुभारंभ होत असून ही योजना गरजू व गरिबांसाठी उपयुक्त ठरेल, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. शिवभोजन योजनेच्या वाशिम कृषि उत्पन्न बाजार समिती परिसरातील केंद्राच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बन्सोड, नगराध्यक्ष अशोक हेडा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार विजय साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, वाशिम शहरातील कृषि बाजार समिती परिसरातील रेल्वे स्थान

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर - पालकमंत्री शंभूराज देसाई

Image
•     वाशिम येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ·             पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण वाशिम , दि. २६ : जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि समतोल विकासासाठी पायाभूत सुविधा, सिंचन, ग्रामीण रस्ते, आरोग्य सुविधा निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विकास कामांसाठी शासनाकडून अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासन यांना सोबत घेवून प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. पोलीस कवायत मैदान येथे आज प्रजासत्ताक दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बन्सोड, नगराध्यक्ष अशोक हेडा, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी (महसूल) रमेश काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप मह

जिल्हा वार्षिक योजनेतील कामांना गती द्या - पालकमंत्री शंभूराज देसाई

Image
•     जिल्हा नियोजन समितीची सभा •     सन २०२०-२१ करिता १३२.४० कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी •     आरोग्य, ग्रामीण रस्ते विकासावर विशेष भर देणार वाशिम , दि. २५ : जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध निधी विहित कालावधीत खर्च होणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी जिल्हा वार्षीक योजनेतून सुरु असलेल्या कामांना गती द्यावी. तसेच ही सर्व कामे दर्जेदार होतील, याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. नियोजन भवन सभागृहात आज, २५ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे , खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक , आमदार राजेंद्र पाटणी , आमदार अमित झनक , जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बन्सोड, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्यासह समितीच्या सदस्य करुणाबाई कल्ले, ज्योती विश्वास लवटे, हीना कौसर व अंमलबजावणी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी सादरीकरण केले. पालकमंत्री श

पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा वाशिम जिल्हा दौरा

Image
वाशिम , दि. २३ : राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे २४ ते २६ जानेवारी २०२० या कालावधीत वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. पालकमंत्री श्री. देसाई हे २४ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता नांदेड येथून शासकीय मोटारीने वाशिमकडे प्रयाण करतील. सायंकाळी ६.३० वाजता त्यांचे वाशिम येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. सायंकाळी ७.३० वाजता ते जिल्हास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीस उपस्थित राहतील. पालकमंत्री श्री. देसाई हे २५ जानेवारी रोजी सकाळी १०.४५ वाजता शासकीय मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील. सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस ते उपस्थित राहतील. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी आयोजित केलेल्या विविध जिल्हास्तरीय आढावा बैठकांना ते उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ४ वाजता वाशिम शासकीय विश्रामगृह येथे वाशिम जिल्हा शिवसेना सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीला ते उपस्थ

जिल्हा क्रीडा संकुल येथील जलतरण तलावाचे शनिवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Image
वाशिम , दि. २३ : जिल्हा क्रीडा संकुलमध्ये तयार करण्यात आलेल्या सुसज्ज जलतरण तलावाचे लोकार्पण शनिवार, २५ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे राहतील. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार डॉ. रणजीत पाटील, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष हृषीकेश मोडक, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक प्रतिभा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.   जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील खेळाडूंना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामध्ये आता जलतरण तलावाचा समावेश होत आहे. सेमी ऑलिम्पिक म्हणजेच २५ मीटर लांबी व २१ मीटर रुंदी असलेल्या या सुसज्ज जलतरण तलावाचा लाभ जिल्ह्यातील आबालवृद्ध नागरिकांना घेता येईल. तसेच लहान मुलांसही बेबीपूलची निर्म

वाशिम शहरात २६ जानेवारीपासून शिवभोजन

·         पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार शुभारंभ वाशिम , दि. २३ : राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या शिवभोजन योजनेचा रविवार, २६ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ होत आहे. या योजनेंतर्गत शहरात दोन ठिकाणी १० रुपयात भोजन मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने रोज २२५ थाळीचे नियोजन केले आहे. भोजनालय चालविण्यासाठी सद्यस्थितीत सुरु असणाऱ्या खानावळ, एनजीओ, महिला बचत गट, भोजनालय अथवा मेस यापैकी योजना राबविण्यास सक्षम असलेल्या भोजनालयाची जिल्हानिहाय निवड करण्यात आली आहे. शिवभोजनासाठी प्रत्येक थाळीला ग्राहकाकडून १० रुपये घेतले जातील. प्रत्येक थाळीला राज्य शासनाकडून ४० रुपये अनुदान दिले जाईल. भोजनालयातील दर्जा योग्य असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. वाशिम शहरात जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर व कृषि उत्पन्न बाजार समिती परिसरात रेल्वे स्थानक रोडवर या योजनेतून शिवभोजन मिळणार आहे. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत शिवभोजन उपलब्ध असणार आहे. ग्रामीण भागातून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना या योजनेचा फायदा ह

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
वाशिम , दि. २३ : भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार २५ जानेवारी २०२० रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त ‘सशक्त लोकशाहीकरिता मतदार साक्षरता’ हा उद्देश घेवून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये व जिल्हाधिकारी कार्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थिनी व शासकीय महिला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रांगोळी स्पर्धेत महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग घेवून मतदार जागृतीचा संदेश देणाऱ्या रांगोळ्या काढल्या. ‘समझदारी कि पहचान वोट का निशान’, ‘वोट हमारा है अधिकार, करो नही इसको बेकार’, ‘वोट देना आपका अधिकार, बदले मे ना लेना उपहार’ यासारखे संदेश रंगोलीद्वारे देण्यात आले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, उपजिल्हाधिकारी (महसूल) रमेश काळे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, नायब तहसीलदार बी. आर. पाटील यांनी रांगोळी

सामाजिक न्याय विभागाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा - ना. धनंजय मुंडे

Image
·           समाज कल्याण विभागाचा आढावा वाशिम , दि. २० : सामाजिक न्याय विभाग हा समाजातील वंचित घटकाला न्याय देणारा विभाग आहे. त्यामुळे या विभागाच्या योजना समाजातील तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, अशा सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. वाशिम शासकीय विश्रामगृह येथे आज, २० जानेवारी रोजी झालेल्या समाज कल्याण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त विजय साळवी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ. छाया कुलाल, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अनंत मुसळे, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. मुंडे म्हणाले, अनुसूचित जातीमधील व नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीनांना स्वावलंबी बनविण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड स

अकुशल मजुरांना गावातच मिळणार रोजगार

Image
* ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा पातळीवर नोंदविता येईल कामाची मागणी वाशिम, दि. १७ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील मजुरांनी मागणी केल्यानंतर त्यांना गावात अथवा लगतच्या गावात रोजगार उपलब्ध करून दिला जातो. तरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील जॉबकार्डधारक अकुशल मजुरांनी रोजगाराची आवश्यकता असल्यास संबंधित ग्रामपंचायत, तालुका स्तरावर अथवा जिल्हा स्तरावर कामाची मागणी नोंदवावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (रोहयो) शैलेश हिंगे यांनी केले आहे. जिल्ह्यातून कामानिमित्त होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी, त्यांना मागणीनंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो. यासाठी जिल्ह्यात ४ हजार ११९ कामे सेल्फवर ठेवण्यात आली आहेत. यामधून १२ लक्ष ८३ हजार ३६३ मजूर क्षमता निर्माण होणार आहे.  काम मागणीसाठी जॉबकार्डधारक अकुशल मजुरांनी नमुना क्र. ४ मध्ये लेखी अर्ज ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, पंचायत समिती अथवा तहसील कार्यालय, जिल्हा परिषद अथवा जिल्हाधिकारी कार्यालय य

तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत १० जणांवर दंडात्मक कारवाई

Image
वाशिम , दि. १६ : सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व तंबाखू बंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या १० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालय व पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तंबाखू विरोधी अभियानाच्या पथकाने केलेल्या या कारवाईत १५०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. शहरातील बसस्थानक, रेल्वे स्टेशन, पुसद नाका, हिंगोली नाका परिसरात सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व तंबाखू बंदी कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने तंबाखू विरोधी अभियानाच्या पथकाने तंबाखू नियंत्रण कायद्याच्या कलम ४ व कलम ६ नुसार १० जणांवर दंडात्मक कारवाई केली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे डॉ. आदित्य पांढारकर, राम सरकटे, रामकृष्ण धाडवे व पोलीस विभागातर्फे स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष कंकाळ, मुकेश भगत, राजेश गिरी, निलेश इंगळे व प्रेमदास आडे यांचा या पथकात सहभाग होता.

वाशिम जिल्ह्यात रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

Image
·          जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज ·          ९५० लसीकरण बूथ; ३१ मोबाईल टिम तैनात वाशिम , दि. १६ : जिल्ह्यात रविवार, १९ जानेवारी २०२० रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील सुमारे १ लक्ष १९ हजार ४७२ बालकांना यादिवशी पोलिओची लस देण्यात येणार आहे. याकरिता जिल्हा आरोग्य यंत्रणेने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. लसीकरण मोहिमेसाठी शहरी भागातील १२४ व ग्रामीण भागातील ८२६ अशा एकूण ९५० बुथवर २ हजार ५१७ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण भागात १७१ व शहरी भागात २५ असे एकूण १९६ पर्यवेक्षक या मोहिमेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणार आहेत. वीट भट्ट्या, गिट्टी खदान, मजुरांच्या वस्त्यांमधील बालकांना लसीकरण करण्यासाठी ग्रामीण भागात २३ व शहरी भागात ८ अशा एकूण ३१ मोबाईल टीम कार्यरत राहणार आहेत. प्रवासातील बालकांना लसीकरण करण्यासाठी रेल्वे स्टेशन, बस स्थानक, बस थांबे, चौफुलीच्या ठिकाणी १३१ ट्रान्सिट टीम दोन पाळीमध्ये कार्यरत राहणार आहेत. ग्रामीण भागामध्ये २१ ते २३ जानेवारी दरम्यान आणि शहरी भाग