वाशिम येथे 3 जानेवारी रोजी ‘सायबर सेफ वुमेन’ कार्यशाळा
- Get link
- X
- Other Apps
· महिला, बालकांवरील अत्याचार व सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती
· हॅपी फेसेस स्कूल येथे विद्यार्थिनी, महिलांसाठी कार्यशाळा
वाशिम, दि. ०२ : महिला व बालकावर होणारे अत्याचार, सायबर गुन्हे रोखण्यासाठी व या अत्याचारांसंदर्भातील कायद्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आज, ३ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ वाजता हॅपी फेसेस स्कूल येथील सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी उपस्थित विद्यार्थिनी, महिलांना ‘सायबर सेफ वुमेन’ या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत.
सध्याच्या संगणकाच्या, तांत्रिक, धावपळीच्या युगात तरुणी, महिला कशा प्रकारे सायबर संबंधित गुन्ह्यांना बळी पडतात, अशा गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, तसेच सायबर गुन्हे विषयक कायदे याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने ‘सायबर सेफ वुमेन’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत कार्यशाळेला शहरातील माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका, विविध स्वयंसेवी संस्थांच्या महिला प्रतिनिधी, पोलीस ठाण्याच्या महिला दक्षता समितीच्या महिला सभासद उपस्थित राहणार आहेत. यावेळी स्पर्धा परीक्षा व सायबर संबधित पुस्तकांचे स्टॉल सुद्धा लावण्यात येणार आहेत. तरी माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन युवतींनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पवन बन्सोड यांनी केले आहे.
*****
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment