राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
वाशिम, दि. २३ : भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक
अधिकारी यांच्या निर्देशानुसार २५ जानेवारी २०२० रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
करण्यात येणार आहे. यानिमित्त ‘सशक्त लोकशाहीकरिता मतदार साक्षरता’ हा उद्देश
घेवून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये व जिल्हाधिकारी कार्यालयात रांगोळी
स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थिनी व शासकीय महिला कर्मचाऱ्यांचा
उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रांगोळी स्पर्धेत
महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग घेवून मतदार जागृतीचा संदेश देणाऱ्या रांगोळ्या
काढल्या. ‘समझदारी कि पहचान वोट का निशान’, ‘वोट हमारा है अधिकार, करो नही इसको
बेकार’, ‘वोट देना आपका अधिकार, बदले मे ना लेना उपहार’ यासारखे संदेश
रंगोलीद्वारे देण्यात आले.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश
मोडक, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन,
उपजिल्हाधिकारी (महसूल) रमेश काळे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार,
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, नायब तहसीलदार बी. आर. पाटील यांनी
रांगोळी स्पर्धेला भेट देवून रांगोळीची पाहणी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील स्पर्धेत कल्पना ईश्वरकर
(समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद), प्रांजली चिपडे व लक्ष्मी काळे (महिला व बाल
कल्याण विभाग), संध्या इंगळे व किरण जावळे (जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी
कार्यालय), निशा मुळावकर (भूसुधार विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय), अर्चना घोळवे
(संजय गांधी योजना विभाग), सीता राऊत (आस्थापना विभाग), शीतल दिवडे व योगिता निमके
(शिक्षिका), सुवर्णा सुर्वे (शेतकरी पॅकेज विभाग), नीता आरु (विविध शाखा)
यांच्यासह महिला कर्मचारी सहभागी झाल्या. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. महाजन व प्रा.
शुभांगी दामले यांनी परीक्षण केले. अर्चना घोळवे, कल्पना ईश्वरकर आणि प्रांजली
चिपडे व लक्ष्मी काळे यांच्या रांगोळीला अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय
क्रमांक देण्यात आला.
*****
Comments
Post a Comment