जिल्हा क्रीडा संकुल येथील जलतरण तलावाचे शनिवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
वाशिम, दि. २३ : जिल्हा क्रीडा संकुलमध्ये तयार
करण्यात आलेल्या सुसज्ज जलतरण तलावाचे लोकार्पण शनिवार, २५ जानेवारी २०२० रोजी
सायंकाळी ५ वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे
राहतील.
या
कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार भावना गवळी, आमदार
गोपीकिशन बाजोरिया, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार डॉ. रणजीत पाटील, आमदार लखन
मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी
तथा जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष हृषीकेश मोडक, पोलीस अधीक्षक वसंत
परदेशी, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक प्रतिभा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार
आहे.
जिल्हा
क्रीडा संकुल समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील खेळाडूंना विविध सुविधा उपलब्ध
करून दिल्या जात आहेत. त्यामध्ये आता जलतरण तलावाचा समावेश होत आहे. सेमी ऑलिम्पिक
म्हणजेच २५ मीटर लांबी व २१ मीटर रुंदी असलेल्या या सुसज्ज जलतरण तलावाचा लाभ
जिल्ह्यातील आबालवृद्ध नागरिकांना घेता येईल. तसेच लहान मुलांसही बेबीपूलची
निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये यांनी
दिली.
*****
Comments
Post a Comment