शिवभोजन योजना गरिबांसाठी उपयुक्त - पालकमंत्री शंभूराज देसाई
·
वाशिम येथे शिवभोजन योजनेचा शुभारंभ
वाशिम, दि. २६ :
राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात मिळावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या
संकल्पनेतून शिवभोजन योजना सुरु करण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा
विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या योजनेतून पहिल्या टप्प्यात राज्यातील जिल्हा
मुख्यालयी १० रुपयात जेवण मिळणार आहे. वाशिम शहरातही आजपासून शिवभोजन योजनेचा
शुभारंभ होत असून ही योजना गरजू व गरिबांसाठी उपयुक्त ठरेल, असे पालकमंत्री
शंभूराज देसाई यांनी सांगितले. शिवभोजन योजनेच्या वाशिम कृषि उत्पन्न बाजार समिती
परिसरातील केंद्राच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी
जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा परिषदेच्या प्रभारी
मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बन्सोड, नगराध्यक्ष अशोक हेडा, अतिरिक्त पोलीस
अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा पुरवठा
अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार विजय साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री
श्री. देसाई म्हणाले, वाशिम शहरातील कृषि बाजार समिती परिसरातील रेल्वे स्थानक
रोडवरील श्रीकृष्ण देशमाने यांचे भोजनालय, जिल्हा सामान्य रुग्णालय येथील नगरपरिषद
कॉम्प्लेक्समधील भोजनालयात दुपारी १२ ते २ वा. दरम्यान शिवभोजन उपलब्ध असणार आहे. याचा
लाभ कामानिमित्त शहरात येणाऱ्या गरीब,
गरजू व्यक्तींना होईल, असे
मत पालकमंत्र्यांनी व्यक्त केले.
****
Comments
Post a Comment