पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा वाशिम जिल्हा दौरा
वाशिम, दि. २३ : राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त,
नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री तथा
जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे २४ ते २६ जानेवारी २०२० या कालावधीत वाशिम
जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
पालकमंत्री श्री. देसाई हे २४ जानेवारी रोजी दुपारी २.३०
वाजता नांदेड येथून शासकीय मोटारीने वाशिमकडे प्रयाण करतील. सायंकाळी ६.३० वाजता
त्यांचे वाशिम येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. सायंकाळी ७.३० वाजता ते
जिल्हास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीस उपस्थित राहतील.
पालकमंत्री श्री. देसाई हे २५ जानेवारी रोजी सकाळी
१०.४५ वाजता शासकीय मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील. सकाळी ११
वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन
समितीच्या बैठकीस ते उपस्थित राहतील. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी आयोजित केलेल्या
विविध जिल्हास्तरीय आढावा बैठकांना ते उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ४ वाजता
वाशिम शासकीय विश्रामगृह येथे वाशिम जिल्हा शिवसेना सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीला
ते उपस्थित राहतील. सायंकाळी ५ वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे जलतरण तलावाच्या
लोकार्पण सोहळ्यास पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सोयीनुसार शासकीय
विश्रामगृहाकडे प्रयाण व मुक्काम करतील.
२६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता पालकमंत्री श्री.
देसाई हे शासकीय मोटारीने पोलीस कवायत मैदानाकडे प्रयाण करतील. सकाळी ९.१५ वाजता भारतीय
प्रजासत्ताक दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास ते
उपस्थित राहतील. सकाळी १०.३० वाजता जुने पोलीस मुख्यालय येथे पोलीस पेट्रोलपंप
उद्घाटनास पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ वाजता
पालकमंत्र्यांच्या हस्ते मार्केट कमिटी जवळ शिवभोजन योजनेचा शुभारंभ होईल. दुपारी
१२ वाजता ते शासकीय मोटारीने अमरावतीकडे प्रयाण करतील.
*****
Comments
Post a Comment