आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पत्रकार दिनानिमित्त अभिवादन
वाशिम, दि. ०६ : पत्रकार दिनानिमित्त आज, ६ जानेवारी रोजी जिल्हा माहिती कार्यालयात विशेष
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,
जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे यांच्यासह पत्रकार बांधवांनी ‘दर्पण’कार
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पण करून
अभिवादन केले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री. खडसे, श्री.
अंभोरे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेविषयी आपले विचार
व्यक्त केले. कार्यक्रमाला विश्वनाथ राऊत, नंदकिशोर शिंदे, नंदकिशोर वैद्य, सुनील
मिसर, सुनील कांबळे, गजानन भोयर, विठ्ठल देशमुख, सुनील पाटील, किशोर गोमाशे, दत्ता
महल्ले, संदीप पिंपळकर, गणेश मोहळे, मदन देशमुख, निलेश सोमाणी, अविनाश भगत, इरफान
सय्यद, जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहाय्यक तानाजी घोलप, राजू जाधव, विजय
राठोड, गजानन इंगोले, विश्वनाथ मेरकर आदी उपस्थित होते.
*****
Comments
Post a Comment