एम.सी.ई.डी.च्यावतीने अन्न प्रक्रिया प्रशिक्षण



वाशिम, दि. ०९ :  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.)च्या वतीने जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत सर्वसाधरण योजना सन २०१९-२० अंतर्गत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती-महिलांसाठी मालेगाव येथे अन्न प्रक्रियावर आधारित तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे एक महिन्याचे मोफत प्रशिक्षण असून ते पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना १ हजार रुपये विद्यावेतन व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी १४ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता मालेगाव येथील पालवी शिवणकला केंद्र, जुनी पंचायत समिती, नागरतास रोड येथे उपस्थित राहावे. प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक यांच्याशी भ्रमणध्वनी क्र. ७७७६८१५४८१/९०७५७७६५९५, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, काळे कॉम्प्लेक्स, जिल्हा उद्योग केंद्रासमोर, काटा रोड वाशिम (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३२८३८, भ्रमणध्वनी क्र. ८८०५५५१४६२) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रांसह शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, मागासवर्तीय असल्यास जातीचे प्रमाणपत्र, स्वतःचे बँक खाते पासबुकची सत्यप्रत व व दोन फोटो आदी कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहावे. निवड समितीमार्फत प्रत्यक्ष मुलाखतीमधून ३० प्रशिक्षणार्थींची निवड प्रशिक्षणासाठी केली जाणार आहे. प्रशिक्षणार्थी हा किमान ७ वी उत्तीर्ण किंवा पदवी, पदविका आय.टी.आय. प्रमाणपत्र किंवा कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रम प्रमाणपत्रधारक आणि १८ ते ४५ वर्षे वयोगटातील, वाशिम जिल्ह्यातील असावा. त्याशिवाय कोणत्याही वित्त संस्थेचा थकबाकीदार नसावा. प्रवेशासाठी एम.सी.ई.डी.चे पोर्टल www.mced.in वर ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे आवश्यक असल्याचे वाशिम एम.डी.ई.सी.चे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.
****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे