७ व ८ जानेवारी रोजी भरणारे आठवडी बाजार राहणार बंद
जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक
वाशिम, दि. ०५ : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत सहा पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक
२०१९ करीता जिल्ह्यात मंगळवार, ७ जानेवारी २०२० रोजी मतदान होत आहे. तसेच बुधवार,
८ जानेवारी २०२० रोजी मतमोजणी होणार आहे. मार्केट अँड फेअर अॅक्ट १८६२ चे कलम ५
मधील तरतुदीनुसार प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हा दंडाधिकारी तथा
जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक क्षेत्रात
मतदानाच्या दिवशी म्हणेच ७ जानेवारी २०२० रोजी व मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच ८
जानेवारी २०२० रोजी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
७ व ८ जानेवारी २०२० रोजी होणारे आठवडी बाजार ९
जानेवारी २०२० रोजी भरविण्यात यावेत, असेही जिल्हा दंडाधिकारी यांनी आपल्या आदेशात
नमूद केले आहे.
Comments
Post a Comment