‘रेशीम रथ’च्या माध्यमातून होणार रेशीम शेतीविषयी जनजागृती



महारेशीम अभियान २०२०

·        जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दाखविली हिरवी झेंडी
वाशिम, दि. १० : रेशीम शेतीच्या प्रसारासाठी तसेच रेशीम शेतीची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी जिल्ह्यात महारेशीम अभियान २०२० राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत रेशीम शेतीची माहिती पोहोचविण्यासाठी जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या ‘रेशीम रथ’ला आज जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी हिरवी झेंडी दाखविली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा रेशीम विकास अधिकारी ए. एल. मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रेशीम शेतीची माहिती देण्यासाठी ‘रेशीम रथ’ जिल्ह्यातील गावांमध्ये फिरविण्यात येणार आहे. महारेशीम अभियान अंतर्गत जिल्ह्यात रेशीम शेतीच्या प्रसारासाठी, माहिती देण्याबरोबरच नवीन रेशीम लागवडसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे, असे श्री. मोरे यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे