मत्स्य व्यवसायासाठी मासेमारांना मिळणार किसान क्रेडीट कार्ड
वाशिम, दि. ०१ : केंद्र सरकारने किसान क्रेडीट कार्ड ही सुविधा आता मच्छिमारांना
मत्स्यव्यवसायाकरिता आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी सुरु केली आहे. या योजने
अंतर्गत मत्स्य शेतकऱ्यांना मत्स्य संवर्धनासाठी बीज, खाद्य, खते, प्रो-बायोटीक्स,
तलावांचे नुतनीकरण, मत्स्यबीज केंद्रांसाठी आवर्ती खर्च, मासळी महिला विक्रेता
यांच्या करिता खेळते भाग भांडवल, तलाव ठेक्याने घेताना तलावाच्या भाडेपट्टीच्या
पूर्ततेसाठी अर्थसहाय्य इत्यादी प्राथमिक भांडवलाची गरज भागविण्यासाठी अर्थसहाय्य
उपलब्ध होवू शकते.
अर्थसहाय्य
वेळेत परत केल्यास शासन व्याजदरात ३ टक्क्यांपर्यंत सवलत देणार आहे. अधिक
माहितीसाठी सहाय्यक मत्स्य व्यवसाय कार्यालय, श्री घनश्याम शर्मा यांची इमारत,
पहिला माळा, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर, वाशिम येथे संपर्क साधावा,
असे आवाहन वाशिमच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्त अमिता जैन यांनी
केले आहे.
*****
Comments
Post a Comment