पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत सभा सोमवारी
·
१६
जानेवारीला होणार सभापती, उपसभापती निवड
·
१७
जानेवारी रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा
वाशिम, दि. १० : ग्रामविकास विभागाकडील महाराष्ट्र
शासन राजपत्र असाधारण क्र. ४१६, दि. २७ नोव्हेंबर २०१९ व महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण क्र. ४१७, दि. २७ नोव्हेंबर २०१९ नुसार वाशिम जिल्ह्यातील सर्व सहा पंचायत
समितींच्या सभापती पदांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. याकरिता सोमवार, १३
जानेवारी २०२० रोजी दुपारी १२.३० वाजता वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील
नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत
सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित
रहावे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
१३ जानेवारी २०२० रोजी पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण
सोडत झाल्यानंतर गुरुवार, १६ जानेवारी २०२० रोजी सर्व पंचायत समितींच्या सभापती,
उपसभापती पदाची निवडणूक होणार आहे. याकरिता सर्व संबंधित पंचायत समितींच्या
सभागृहात पीठासीन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
वाशिम जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक
शुक्रवार, १७ जानेवारी २०२० रोजी वाशिम जिल्हा परिषद येथे होणार
असून याकरिता पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, वाशिम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
Comments
Post a Comment