पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ‘दक्षता’ पेट्रोलपंपचे उद्घाटन
·
वाशिम
जिल्हा पोलीस कल्याण निधी अंतर्गत उपक्रम
वाशिम, दि. २६ :
जिल्हा पोलीस कल्याण निधी अंतर्गत वाशिम येथील जुने पोलीस मुख्यालय परिसरात
उभारण्यात आलेल्या ‘दक्षता’ पेट्रोलपंपचे उद्घाटन आज, २६ जानेवारी रोजी पालकमंत्री
शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले.
यावेळी
नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेच्या प्रभारी
मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बन्सोड, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अतिरिक्त पोलीस
अधीक्षक विजयकुमार चव्हाण, पोलीस उपाधीक्षक मृदुला लाड, उपविभागीय पोलीस अधिकारी
डॉ. पवन बन्सोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जिल्हा पोलीस कल्याण निधी अंतर्गत वाशिम शहरात पेट्रोलपंप
सुरु होत आहे. हा अतिशय चांगला उपक्रम आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी मल्टीपर्पज
स्टोअर उभारण्याची संकल्पना काही जिल्ह्यांमध्ये राबविली जात आहे. यामध्ये किराणा
साहित्यासह इलेक्ट्रॉनिक वस्तूही सवलतीच्या दरात मिळतात. वाशिम जिल्ह्यातही असा उपक्रम
राबविण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना लाभ होईल,
असे पालकमंत्री म्हणाले.
Comments
Post a Comment