जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण




·        धनुर्विद्या संकुलाचे उद्घाटन
वाशिम, दि. २६ : जिल्हा क्रीडा संकुल येथे सेमी ऑलिम्पिक आकारातील सुसज्ज जलतरण तलावाची व धनुर्विद्या संकुलाची निर्मिती करण्यात आली आहे. धनुर्विद्या संकुल व जलतरण तलावाचे लोकार्पण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते २५ जानेवारी रोजी झाले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक प्रतिभा देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये, तालुका क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार, संजय पांडे, किशोर बोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जलतरण तलावाच्या कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर पालकमंत्री श्री. देसाई व उपस्थित मान्यवरांनी तलावाची पाहणी केली. तसेच जिल्ह्यातील जलतरणपटू व नागरिकांना जलतरणाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अभिनंदन केले.
जलतरण तलावाचा आकार २५ मीटर x २१ मीटर असून जलतरण तलावामध्ये ८ लेन व डायव्हिंग बोर्ड बसविण्यात आले आहेत. जलतरण स्पर्धेसाठी आवश्यक इतरही साहित्य याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तलावामध्ये उतरण्यासाठी सहा ठिकाणी सिड्यांची व्यवस्था आहे, तसेच तलावाच्या चारही बाजूला रेलिंग लावण्यात आले आहेत. जलतरण तलावातील पाणी शुद्ध करण्यासाठी अद्ययावत शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले आहे. लहान मुलांसाठी ९ मीटर x ६ मीटर आकाराचा बेबी तलाव तयार करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील खेळाडूंचा धनुर्विद्याकडे असलेला कल लक्षात घेवून जिल्हा क्रीडा संकुल येथे धनुर्विद्या संकुलाची निर्मिती करण्यात आली आहे. या संकुलाचे उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. या संकुलामध्ये खेळाडूंना धनुर्विद्याचा नियमित सराव करता येणार आहे.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे