मंगरुळपीर शहरातील वाहतूक मार्गांमध्ये बदल
वाशिम, दि. ०७ : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ जानेवारी रोजी मतदान झाले असून आज, ८ जानेवारी २०२० रोजी मतमोजणी होणार आहे. मंगरुळपीर तालुक्यातील मतमोजणी मंगरुळपीर शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे होणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक मार्गांमध्ये ८ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजलेपासून ते संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंतच्या कालावधीत बदल करण्यात आला आहे.
मंगरुळपीर शहरातून जाणारी वाशिम-कारंजा रोडवरील वाहतूक बस स्थानक बायपास मार्गे अकोला रोड ते कारंजा चौक मार्गे वळविण्यात आली आहे. मानोरा रोडवरून येणारी वाहतूक आशा बिकानेर ते शनी मंदिर ते मंगलधाम मार्गे अरिहंत मॉलमार्गे मंगरुळपीर बस स्थानकाकडे वळविण्यात आली आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते अरिहंत मॉलपर्यंतचा रस्ता रहदारीस बंद करण्याचे व मतमोजणीकरिता येणाऱ्या लोकांनी महात्मा फुले उद्यानमध्ये थांबण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहेत.
Comments
Post a Comment