वाशिम जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना दोन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर
जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक
वाशिम, दि. ०४ : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत ६ पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार ७ जानेवारी २०२० रोजी जिल्ह्यात मतदान होणार आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालयांना ६ जानेवारी २०२० व ७ जानेवारी २०२० रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यातील शाळा, विद्यालये, महाविद्यालयातील खोल्या मतदान केंद्रासाठी वापरण्यात येणार आहेत. तेथे मतदान साहित्य घेवून जाणे व मतदान केंद्र ताब्यात घेणे आवश्यक आहे. ६ जानेवारी व ७ जानेवारी रोजी शाळा, विद्यालये, महाविद्यालयातील शिक्षक व इतर कर्मचारी यांची मतदान पथकात नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालयांना ६ जानेवारी २०२० व ७ जानेवारी २०२० रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.
*****
Comments
Post a Comment