अमरावती येथे मोफत निवासी उद्योजकता विकास कार्यक्रम



·        १७ जानेवारी रोजी वाशिम येथे उद्योजकता परिचय कार्यक्रम
वाशिम, दि. ०९ :  उद्योग संचालनालय व महाराष्ट्र उद्योजक, व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष (मैत्री) यांच्या सहकार्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १८ दिवसीय मोफत निवासी उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन अमरावती येथे २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२० या कालावधीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाबाबत जनजागृती व इच्छुकांचे प्रवेश अर्ज भरून घेण्यासाठी शुक्रवार, १७ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११.३० वाजता वाशिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे एकदिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात प्राप्त अर्जांमधून प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे ४० उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवार हा अनुसूचित जाती प्रवर्गातील, किमान ७ वी पास असावा. १० वी पास व महिलांना प्राधान्य राहील. वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे तसेच महाराष्ट्राचा किमान १५ वर्षापासूनचा रहिवासी असावा, वाशिम एम.सी.ई.डी. द्वारे कळविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी खुशाल रोकडे (भ्रमणध्वनी क्र. ७०५७९६८१३१/७२६३०७३०९५), प्रकल्प अधिकारी धम्मपाल खंडारे (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३२८३८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे