Posts

Showing posts from June, 2019

वृक्ष दिंडीला पालकमंत्र्यांनी दाखविली हिरवी झेंडी

Image
·          ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेविषयी जनजागृती वाशिम , दि. २९ : राज्य शासनाच्यावतीने १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेविषयी जनजागृती करण्यासाठी आयोजित वृक्ष दिंडीला आज पालकमंत्री संजय राठोड यांनी हिरवी झेंडी दाखविली. पालकमंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते वृक्ष पूजनानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून दिंडीला सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उपवन संरक्षक सुमंत सोळंकी, सहाय्यक वन संरक्षक किशोरकुमार येळे, वन परिक्षेत्र अधिकारी एस. एस. नांदुरकर, जन्मेंजय जाधव यांच्यासह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पर्यावरण रक्षण व वनक्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनामार्फत ३३ कोटी वृक्ष लागवड मोहीम १ जुलै पासून सुरु होत आहे. या मोहिमेत लोकसहभाग मिळावा, याकरिता विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून वृक्ष दिंडी काढण्यात आली. पालकमंत्री श्री. राठोड यांनी हिरव

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते भिंतीपत्रक आणि घडिपुस्तिकेचे विमोचन

Image
वाशिम , दि. २९ : पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज २९ जून रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या प्रारंभी नियोजन भवन येथे जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षिक योजना सन २०१८-१९ या वर्षातील निधीतून तयार केलेले भिंतीपत्रक आणि राज्य सरकारच्या चार वर्षातील महत्वपूर्ण योजनांची माहिती देणाऱ्या ‘प्रतिबिंब विकासाचे..’ या घडीपुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील नागरीकांना प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण आणि शहरी) , डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या योजनांची माहिती व्हावी यासाठी हे भिंतीपत्रक तयार करण्यात आले आहे. राज्य सरकारने चार वर्षात जिल्ह्यात राबविलेल्या महत्वपूर्ण योजनांची माहिती देणारी घडीपुस्तिका जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केली आहे. या योजनांमध्ये जिल्ह्यातील द

पालकमंत्र्यांच्या हस्ते वाशिम नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाच्या हायड्रोलिक शिडी वाहनाचे उद्घाटन

Image
वाशिम , दि. २९ : वाशिम नगरपरिषदेचा अग्निशमन विभाग सुसज्ज करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण अशा हाड्रोलिक शिडी वाहनाचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांनी आज २९ जून रोजी नियोजन भवनाच्या परिसरात केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख , जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना , नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले , अग्निशमन अधिकारी अनुज बाथम व श्री. माकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा नियेाजन समितीच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या या वाहनावरील हायड्रोलिक शिडीची उंची १५ मीटर इतकी आहे. टाटा ९०९ या वाहनावर नवीन चेचीससह ही हायड्रोलिक शिडी लावण्यात आली आहे. ५३ लक्ष रुपयातून हे वाहन खरेदी करण्यात आले आहे. या वाहनाचे वैशिष्ट्य म्हणजे १५ मीटर उंचीपर्यंत इमारतीला आग लागल्यास त्या इमारतीमधील लोकांचे प्राण वाचविणे, तसेच त्या इमारतीमधील आग विझवीण्याचे काम करणे शक्य होणार आहे. ही हायड्रोलिक शिडी ही पूर्णपणे स्वत: भोवती गोल फिरुन आपल्याला पाहिजे त्या जागेवर थांबते. त्यामुळे रेस्क्यु तसेच फायर फायटींग करता येते. या वाहन

पिक कर्ज वाटप, पिक विमा रक्कम वितरणास गती द्या - पालकमंत्री संजय राठोड

Image
·          जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा ·          प्रत्येक तालुका कृषि अधिकारी कार्यालयात विमा कंपनीचा प्रतिनिधी ठेवा ·          आरोग्य, कृषि व नगरविकास विभागाच्या योजनांचा सविस्तर आढावा घेणार वाशिम , दि. २९ : जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १८ टक्केच पिक कर्जाचे वाटप झाले आहे. पिक कर्ज वाटपाबाबत राष्ट्रीयकृत बँका उदासीन असल्याचे पिक कर्ज वितरणाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. सर्व बँकांनी पिक कर्ज वितरणाचा वेग वाढवावा. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गत वर्षीच्या खरीप हंगामातील पिक विम्यापोटी सुमारे ४ कोटी ४७ लाख रुपये नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त झाली आहे असून पिक विमा कंपनी व संबंधित बँकेने समन्वय साधून या रक्कमेचे तातडीने वाटप करावे, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी आज नियोजन भवन येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेश

ग्राहकांच्या तक्रारींचा महावितरणने तातडीने निपटारा करावा - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
·         जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सभा वाशिम , दि. २६ : महावितरणच्या संदर्भात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद व लोकशाही दिनात दाखल होणाऱ्या तक्रारी अधिक आहेत. महावितरणच्या स्तरावर ग्राहक तक्रार निवारणासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. या यंत्रणेकडे दाखल होणाऱ्या तक्रारींची दखल तातडीने घेवून त्याचा निपटारा लवकरात लवकर करण्यासाठी महावितरणने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सभेत दिल्या. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा परिषदेचे सदस्य सचिव देवराव वानखेडे, वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले यांच्यासह शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, वीज बिलातील चूक, चुकीची वीज बिल आकारणी, मीटर नादुरुस्त असणे, रीडिंग न घेता वीज बिल आकारणी अशा स्वरूपाच्या तक्रारी सातत्याने दाखल होतात. या तक्रारी निकाली काढण्यासाठी महावितरणने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी. तसेच ग्राहक तक्रार निवारणासाठी सुरु करण्यात आलेल्या मोबाईल अॅप्लिकेशनबाबत अधिकाधिक जनजागृत

शाहू महाराजांचे विचार समाजात रुजणे आवश्यक - हर्षदा देशमुख

Image
·         सामाजिक न्याय दिनानिमित्त विविध उपक्रम वाशिम , दि. २६ : तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहोचवून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या, त्यांना प्रगतीची समान संधी देवून सामाजिक समतेसाठी प्रयत्न करणाऱ्या राजर्षि शाहू महाराज यांचे विचार समाजात रुजणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी व्यक्त केले. सामाजिक न्याय दिनानिनिमित्त आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीच्या सभापती पानुताई जाधव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ. छाया कुलाल, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, वाशिम नगरपरिषदचे मुख्याधिकारी वसंत इंगोले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारप्राप्त गोपाळराव आटोटे, धोंडूजा इंगोले, सु. ना. खंडारे, शिवमंगलअण्णा राऊत, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी अनंत मुसळे, सुमन पट्टेबहाद्दूर

बँकांनी पीक कर्ज देण्यासाठी शेतकऱ्यांपर्यत पोहचावे - हृषीकेश मोडक

Image
पीक कर्ज आढावा बैठक 21 जूनपर्यंत 257 कोटी पीक कर्ज वाटप वाशिम , दि . 25 : जिल्हयातील कोणताही पात्र शेतकरी हा पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी . पीक कर्जासाठी कोणत्याही शेतकऱ्याला सावकाराकडे जाण्याची वेळ येणार नाही यासाठी बँकांनी पीक कर्ज देण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे . असे निर्देश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले .       जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात 24 जून रोजी बँकांकडून पीक कर्जाचा आढावा घेतांना आयोजित बैठकीत श्री . मोडक बोलत होते . यावेळी अग्रणी जिल्हा प्रबंधक दत्तात्रय निनावकर , नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे यांची प्रमुख उपस्थिती होती .       श्री . मोडक म्हणाले , शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करणे हे बँकांचे महत्वाचे काम आहे . बँकापर्यंत पीक कर्जासाठी शेतकरी का येत नाही याबाबतची वस्तूस्थिती बँकांनी जाणून घ्यावी . बँका शेतकऱ्यांना सहकार्य करीत नाही असा शेतकऱ्यांचा आक्षेप असतो , तो दूर करण्यासाठी बँकांनीच आता सामाजिक बांधिलकी जोपासून शेतकऱ्यांपर्यंत पोहचून त्यांना पीक कर्ज उपलब्ध कर

योग जीवनाचा अविभाज्य भाग - हृषीकेश मोडक 5 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Image
वाशिम , दि . 21 : आजच्या धकाधकीच्या व्यस्त जीवनात तंदुरुस्त राहण्यासाठी काही जण जीममध्ये जातात . कुणी धावतात तर कुणी व्यायाम करतात . प्रत्येक भारतीयाने शारिरिकदृष्टया तंदुरुस्त राहून मानसिकदृष्टया सक्षम झाले पाहिजे . संपन्न आयुष्य जगण्यासाठी योग महत्वाचा असून योग हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे . असे प्रतिपादन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक   यांनी केले .       आज 21 जून रोजी वाशिम येथील वाटाणे लॉनमध्ये 5 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमाचे आयोजन आयुष मंत्रालय , भारत सरकार , महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त वतीने करण्यात आले . मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी मोडक यावेळी बोलत होते . मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना , पोलीस अधिक्षक वसंत परदेशी , पतंजलीचे डॉ . भगवंतराव वानखेडे , आर्ट ऑफ लिव्हींगचे डॉ . हरीष बाहेती , विद्याभारतीचे दिलीप जोशी , स्वामी सत्यानंद योग केंद्राचे राम छापरवाल , वाशिम नगर परिषदेचे मुख