मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु
वाशिम, दि. ११ : सिव्हील लाईन वाशिम
येथील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहामध्ये इयत्ता ८
वीमधील विद्यार्थिनींना रिक्त असलेल्या जागांवर गुणवत्तेनुसार प्रवेश द्यावयाचा
आहे. याकरिता पात्र व इच्छुक विद्यार्थिनींनी ३० जून २०१९ पूर्वी प्रवेश अर्ज सादर
करावेत. अधिक माहितीसाठी वाशिम सिव्हील लाईन येथील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या
मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांच्याशी कार्यालयीन वेळेत
संपर्क साधावा. याठिकाणी प्रवेश अर्ज विनामुल्य मिळतील.
वसतिगृहामध्ये वर्ग ८ मध्ये प्रवेश घेण्यासाठी
विद्यार्थिनी वाशिम जिल्ह्याची रहिवासी तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,
वि.जा.भ.ज., विशेष प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, अपंग, अनाथ यापैकी एका
संवर्गातील असावी. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, सक्षम
अधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, तहसीलदार यांच्या सहीचा उत्पन्नाचा दाखला,
सरपंच, ग्रामपंचायत किंवा पोलीस पाटील यांच्या सहीचा रहिवासी दाखला जोडावा. प्रवेशित
विद्यार्थिनींना शासकीय नियमानुसार विनामुल्य भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य
पुरविले जाईल.
Comments
Post a Comment