अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात विनामुल्य प्रवेशाची संधी
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात
विनामुल्य प्रवेशाची संधी
वाशिम, दि. ११ : गरजू व होतकरू आदिवासी विद्यार्थ्यांना तालुक्याच्या व जिल्ह्याच्या
ठिकाणी नामांकित शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेण्याची संधी प्राप्त व्हावी, या
उद्देशाने आदिवासी विकास विभागामार्फत मोफत वसतिगृह सुविधा उपलब्ध करून देण्यात
आली आहे. त्यासाठी सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांनी केले आहे.
अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत अकोला,
वाशिम, बुलडाणा या तीन जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, मुर्तीजापूर, वाशिम,
मंगरूळपीर, बुलडाणा, संग्रामपूर व खामगाव या तालुक्यांत वसतिगृहासाठी प्रवेश
प्रक्रिया सुरु असून वर्ग ८ वा, वर्ग ११ वा, पदवी अभ्यासक्रम तसेच पदव्युत्तर पदवी
व व्यावसायिक कोर्सच्या प्रथम वर्षासाठी रिक्त असलेल्या जागांकरिता प्रवेश देण्यात
येणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज करावे व काही
तांत्रिक अडचणी आल्यास अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाशी अथवा
संबंधित वसतिगृहाच्या गृहपालाशी संपर्क साधावा, असे श्री. हिवाळे यांनी कळविले
आहे.
Comments
Post a Comment