बँकांनी पीक कर्ज देण्यासाठी शेतकऱ्यांपर्यत पोहचावे - हृषीकेश मोडक
पीक कर्ज
आढावा बैठक
21
जूनपर्यंत 257 कोटी पीक कर्ज वाटप
वाशिम, दि. 25
: जिल्हयातील कोणताही पात्र शेतकरी हा पीक
कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पीक कर्जासाठी कोणत्याही शेतकऱ्याला सावकाराकडे जाण्याची वेळ येणार नाही यासाठी बँकांनी पीक कर्ज देण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे.
असे निर्देश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील
वाकाटक सभागृहात 24 जून रोजी बँकांकडून पीक कर्जाचा आढावा
घेतांना आयोजित बैठकीत श्री. मोडक बोलत होते. यावेळी अग्रणी जिल्हा प्रबंधक दत्तात्रय निनावकर, नाबार्डचे
जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. मोडक
म्हणाले, शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करणे हे बँकांचे
महत्वाचे काम आहे. बँकापर्यंत पीक कर्जासाठी शेतकरी का येत
नाही याबाबतची वस्तूस्थिती बँकांनी जाणून घ्यावी. बँका
शेतकऱ्यांना सहकार्य करीत नाही असा शेतकऱ्यांचा आक्षेप असतो,
तो दूर करण्यासाठी बँकांनीच आता सामाजिक बांधिलकी जोपासून शेतकऱ्यांपर्यंत पोहचून
त्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन दयावे. ज्या बँकांच्या शाखांनी
पीक कर्ज वाटपात कामगिरी केलेली नाही त्यांच्या शाखा व्यवस्थापकांनी दर सोमवारी
लेखी स्वरुपात कारणे सादर करावी. असे त्यांनी यावेळी
सांगितले.
श्री. निनावकर
म्हणाले, जिल्हयातील बँकांनी पात्र शेतकऱ्यांना त्वरीत पीक
कर्ज उपलब्ध करुन देण्याबातच्या सुचना दिल्या आहे. कोणताही
पात्र शेतकरी हा पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याबाबतही
सुचविले आहे. प्रत्येक आठवडयाला पीक कर्जाच्या वाटपाच्या
स्थितीची माहिती देण्यासाठी संबंधित बँकांच्या जिल्हा समन्वयकांनी उपस्थित
राहण्याचे देखील कळविल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हयात सन 2019-20 या वर्षाच्या खरीप हंगामात 1 लाख 93 हजार 890 शेतकरी सभासदांना 1530 कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 21 जूनपर्यंत केवळ 31 हजार 136 शेतकरी
सभासदांना 257 कोटी 31 लक्ष रुपये पीक
कर्ज वाटप करण्यात आले. पीक कर्ज वाटपाची टक्केवारी 16.82
इतकी आहे.
ज्या बँकांना पीक कर्ज
वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामध्ये अलाहाबाद बँक,
बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीस बँक,
पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, युको बँक, युनियन
बँक ऑफ इंडिया, ॲक्सीस बँक, एचडीएफसी
बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक,
वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक महाराष्ट्र आणि मध्यवर्ती सहकारी
बँकांच्या एकूण 117 शाखांचा समावेश आहे.
*******
Comments
Post a Comment