पालकमंत्र्यांच्या हस्ते वाशिम नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाच्या हायड्रोलिक शिडी वाहनाचे उद्घाटन
वाशिम, दि. २९ : वाशिम नगरपरिषदेचा अग्निशमन विभाग सुसज्ज
करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण अशा हाड्रोलिक शिडी वाहनाचे उद्घाटन पालकमंत्री संजय
राठोड यांनी आज २९ जून रोजी नियोजन भवनाच्या परिसरात केले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, जिल्हाधिकारी
हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, नगरपरिषदेचे
मुख्याधिकारी वसंत इंगोले, अग्निशमन अधिकारी अनुज बाथम व श्री. माकोडे यांची प्रमुख
उपस्थिती होती.
जिल्हा नियेाजन समितीच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या
या वाहनावरील हायड्रोलिक शिडीची उंची १५ मीटर इतकी आहे. टाटा ९०९ या वाहनावर नवीन चेचीससह
ही हायड्रोलिक शिडी लावण्यात आली आहे. ५३ लक्ष रुपयातून हे वाहन खरेदी करण्यात आले
आहे. या वाहनाचे वैशिष्ट्य म्हणजे १५ मीटर उंचीपर्यंत इमारतीला आग लागल्यास त्या इमारतीमधील
लोकांचे प्राण वाचविणे, तसेच त्या इमारतीमधील आग विझवीण्याचे काम करणे शक्य होणार आहे.
ही हायड्रोलिक शिडी ही पूर्णपणे स्वत: भोवती गोल फिरुन आपल्याला पाहिजे त्या जागेवर
थांबते. त्यामुळे रेस्क्यु तसेच फायर फायटींग करता येते. या वाहनाच्या बकेटमध्ये एकाच
वेळी ३ व्यक्ती घेवून पूर्णपणे वर जाऊ शकते व त्यातील फायर फायटींग पंपाची क्षमता ही
प्रती मिनीट ३० ते ४० लिटर पाणी फेकण्याची
आहे. तसेच त्यावर इलेक्ट्रीक पंप देखील बसविण्यात आला असून सदर पंप पाणी व इलेक्ट्रिक
वुडन कटर हे एकाच वेळी काम करण्यास समर्थ आहे.
Comments
Post a Comment